मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

2020 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

महात्मा जोतिबा फुले पुण्यदीन..

                                            क्रांतिसूर्य महात्मा फुले ह्यांचा २८ नोव्हेंबर हा महानिर्वाण दिवस. जातीयवादाच्या चक्रात सापडलेल्या दिन दुबळ्यांचा कैवारी म्हणजे महात्मा फुले. ह्या स्वाभिमानी नेत्याने देशाच्या सामाजिक जीवनात अशी काय उलथापालथ घडवली कि त्याची दखल इतिहासाला घ्यावीच लागली.त्याग,आदर्श, साहस ह्याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे महात्मा फुले.  समाजसेवेला आपले पूर्ण जीवन वाहून घेतलेले दाम्पत्य म्हणून फुले दाम्पत्याचे स्थान इतिहासात कायम अग्रणी राहील.तथाकथित उच्चवर्णीय समाजाकडून होणाऱ्या अन्यायापासून, अत्याचारापासून व गुलामगिरीतून तथाकथित शूद्रातिशूद्र नि समस्त स्त्री वर्गाची मुक्तता व त्यांना हक्काची जाणीव करून देणे हे ह्या महात्म्याचे जीवितकार्य होते. केशवपन सारख्या विकृत नि अमानवी रुढीविरुद्ध हा महात्मा उभा ठाकला नि त्यांनी विधवांच्या केशवपनाविरुद्ध न्हाव्यांचा संप घडवून आणला.स्त्री नि अस्पृश्य ह्यांच्या शिक्षणाविरुद्ध शब्दही काढणे हे पाप मानले जात असतानाच्या...

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साँग...

                                                             छाती ठोक हे सांगू जगाला छाती ठोक हे सांगू जगाला असा विद्वान होणार नाही  कोणी झालाच हो कोणी झालाच  कोणी झालाच विद्वान मोठा  बुद्ध भगवान होणार नाही  छाती ठोक हे सांगू जगाला दिन दुबळ्यांची उडवूनी सुस्ती  चतुर्वरनाची जिरवूणी मस्ती कधी हरला ना हो कधी हरला ना  कधी हरला ना ज्ञानाची कुस्ती  असा पहिलवान होणार नाही  छाती ठोक हे सांगू जगाला ज्याच्या घटनेवर चाले हे राज  ज्ञान वैभव हे त्यालाच साज  कुबेरालाही हो कुबेरालाही  कुबेरालाही वाटावी लाज  असा धनवान होणार नाही  छाती ठोक हे सांगू जगाला ओझं पाठीशी हे उपकाराच कस फिटणार त्या युगांधराच  हे रमेशा त्या हे रमेशा त्या  हे रमेशा त्या प्रभाकराच  कार्य गुणगान होणार नाही  छाती ठोक हे सांगू जगाला असा विद्वान होणार नाही  कोणी झालाच विद्वान मोठा  बुद्ध भ...

मास्क वापरा. जीव वाचवा.

             COVID-19 चा प्रसार प्रतिबंधित करण्यासाठी: आपले हात वारंवार स्वच्छ करा. साबण आणि पाणी किंवा अल्कोहोल-आधारित हॅंड रब वापरा. खोकला किंवा शिंक येणाऱ्या कोणत्याही व्यक्तीपासून सुरक्षित अंतर ठेवा. शारीरिक अंतर शक्य नसल्यास मास्क घाला. आपल्या डोळ्यांना, नाकाला किंवा तोंडाला स्पर्श करु नका. आपण खोकल्यास किंवा शिंकत असल्यास आपले नाक आणि तोंड आपल्या दुमडलेल्या कोपराने किंवा टिश्यूने झाकून टाका. आपल्याला अस्वस्थ वाटत असल्यास घरी रहा. आपल्याला ताप, खोकला आणि श्वास घेण्यात त्रास होत असेल तर वैद्यकीय सल्ला घ्या.

बुद्ध थॉट...

  गौतम बुद्ध म्हणतात- आपण आज जे काही असतो ते आपल्या विचारांचा परिणाम असतो.. आपल्या विचारातून आपलं भविष्य घडत असतं, हे तर सूर्य प्रकाशाइतकं स्वच्छ आहे त्यामुळे आपल्या विचारांचा मार्ग निवडता येणं, स्वतकडे आणि जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन निश्चित करता येणं हे जीवनात अत्यंत महत्वाचं आहे..

साक्षरता दीन विशेष...

                  भारतात, राष्ट्रीय साक्षरता मिशनच्या अनुसार जर एखादी व्यक्ती आपले नाव लिहु आणि वाचु शकत असेल तर त्या व्यक्तीला साक्षर  जाते. वास्तवीक १९८८ मध्ये ‘राष्ट्रीय साक्षरता मिशनची’ सुरुवात झाली होती.                                                    पुर्वीच्या काळी निरक्षर लोकांची मोठ्या प्रमाणात फसवणुक होतं होती. मुख्यतः सावकारांकडुन. अश्या लोकांच्या निरक्षरतेचा फायदा घेउन त्यांच्याकडुन अंगठ्यांचे ठसे घेउन मोठ्याप्रमाणात जमीनी, आर्थीक मालमत्ता लाटण्यात आल्या. पुढे सरकारकडुन सावकारांवर बंधंन आली आणि अश्याप्रकारांना आळा बसला. असे असले तरी निरक्षरतेमुळे अश्या समाजाची वाढच खुंटल्यासारखे झाले. व्यवहारी जगात प्रगतीचे अनेक मार्ग उघडे असतानाही असा निरक्षर समाज पारंपारीक व्यवहारांमध्येच गुंतुन पडला त्यामुळे त्यांचे आर्थीक प्रगतीचे मार्ग खुंटले. बालमजुरी, अल्पवयीन गुन्हेगारी, रस्त्यांवर भिक-मागणारे अनेक ...

शिक्षक दीन विशेष.....

                                                       डॉ. राधाकृष्णन यांचा जन्मदिवस शिक्षक दिन (५ सप्टेंबर) म्हणून साजरा केला जातो.  छोट्या बालकाचे देशाचा उत्कृष्ट नागरिक म्हणून परिवर्तन करण्याचे कार्य शिक्षकाला कारायचे असते. राष्ट्रउभारणीच्या कार्यात शिक्षकाचा मोठा वाटा असतो. डॉ. राधाकृष्णनयांनी एके  ठिकाणी म्हटले आहे - "ज्या देशात निस्वार्थी निरपेक्ष व सेवावृत्तीने कोणतेही कार्य होते तेंव्हा त्या देशातील शिक्षकच खरे सन्मानाला पात्र होतात." आणि म्हणूनच त्यांच्या जन्मदिनी शिक्षकांचा सन्मान केला जातो.                वैदिक संस्कृतीने शिक्षकाला अत्युच्च स्थान दिले आहे. गुरुला देवाच्या स्थानी मानले गेले आहे. जो देतो तो देव. गुरुंनी किंवा शिक्षकांनी कोणत्याही परतफेडीची  अपेक्षा न करता आपल्या जवळचे ज्ञान इतरांना द्यावे ही अपेक्षा समाजाची गुरु कडून असते. जे जे आपणासि ठावे |  ते  ते दुसर्यांस...

रक्षाबंधन....

                                  आयुष्याच्या प्रत्येक वळणावर असेल हातात हात, अगदी प्रवासाच्या कठोर वाटेवरही... असेल माझी तुला साथ, माझ्या जीवनाचा हरेक क्षण तुझ्या रक्षणासाठी सरलेला असेल, राखीच्या प्रत्येक धाग्यासोबत विश्वासच तो सदैव उरलेला असेल… रक्षाबंधनाच्या मन:पूर्वक शुभेच्छा!!

आण्णाभाऊ साठे जयंती विशेष....

                     आण्णाभाऊ साठे यांचा जन्म १ऑगष्ट १९२० या दिवशी सांगली जिल्ह्यातील वाळवे तालुक्यात वाटेगाव या खेड्यात मातंग समाजात झाला. आणि अण्णाभाऊ साठे नावाचा क्रांती सूर्य उगवला.त्यांच्या वडिलांचे नाव भाउराव सिद्धोजी साठे व आईचे नाव वालुबाई होते. त्यांना लहान भाऊ शंकर व बहीण जाईबाई.              बारष्याचे दिवशी त्यांचे नाव तुकाराम ठेवण्यात आले. संत तुकारामा प्रमाणे हाही तुकाराम मोठा साहित्यिक झाला. साहित्यी क्षेत्रातील चमत्कारी ठरला. अर्थात अन्नाभाउच्या बाल्यावस्थेत कोणी म्हटले असते, कि हा मुलगा आंतरराष्ट्रीय ख्याती प्राप्त करील, तर असे भाकित ठरविनार्याला वेडेच ठरविले गेले असते. त्याचे कारण म्हणजे,एक तर पददलित जातीकुळी व विलक्षण दैन्यावस्था, रोज बारा वाजताची वेळ कशी भागेल याचीच भ्रांती असायची अन्नाभाऊंची आई विचारी होती. पूर्वी जिजाबाई ने शिवबाला रामायण-महाभारतातील कथा सांगितल्या, तद्वतच वाळूबाईंनी छोट्या तुकारामाला वीर लहुजी वस्ताद, फकीरा, वीर सत्तू , पिराजी यांच्या गोष्टींचे संस्कार केले ...

हॅपी फ्रेंडशिप डे....

आनंदाच्या क्षणी जो नेमका आठवतो आणि दु:खात असताना नेमका येऊन हजर होतो; तो मित्र असतो. आणि हे दोन्ही क्षण ज्या दिवशी येतात, ते सर्वच दिवस फ़्रेन्डशीप डे असतात.

नागपंचमी विशेष......

सर श्रावणाची सांगे, गोड गुपित कानांत । झुला फांदीवरचा गं, श्रावणाचे गातो गीत ।                  ह्या ओळी ऐकल्या, की लगेच आपल्या डोळ्यापुढे श्रावण पंचमी साठी झाडावर बांधलेले झोके आठवतात. झोक्यांवर झुलणार्या मुली आठवतात. दारीफेर धरून चाललेली नागपंचमी गाणी आठवतात. “चल ग सखे वारूळाला - नागोबाला पुजायला…” या ओळी ओठावर येतात. खरं ना? बरोबरच आहे. कारण श्रावण महिन्यातला हा पहिला सण नागपंचमी. सर्व स्त्रिया, मुली ह्यांना अगदी हा हवासा वाटणारा सण. सर्वच मोठ्या उत्साहने साजरा केला जातो. ह्या दिवशी स्त्रिया नागदेवतेची मनापासून भक्तीभावाने पूजा करतात त्या नागाला दूध पाजतात. शेतकरी ह्या दिवशी शेत नांगरत नाही.  स्त्रिया भाजी चिरत नाहीत, तवा ठेवत नाहीत. नागपंचमीचा सण हा त्या नागदेवतेबद्दल कृतज्ञता आदर व प्रेम व्यक्त करण्याचा दिवस. ह्या सणाला देवापुढे पाटावर गंधाने नाग नागोबा-नागीण तिची पिल्ले काढतात. त्याची पूजा करतात. नागस्तोत्र म्हणतात. दूध, लाह्या ह्यांचा नैवेद्य दाखवतात आणि पूजा करून प्रार्थना करतात की हे नागराजा! आमचे संरक्षण कर, कृपा कर.   ...

लेख क्रमांक .4 वनसंवर्धन दीन विशेष.....

                                                       “मुलांनो हे जे १०० मजली सायन्स सेंटर तुम्ही पहात आहात हा विज्ञानाचा आणि मानवाने बनवलेल्या असंख्य अजब यंत्रांचा एक नमुना आहे. काही वर्षांपुर्वी ह्या ठिकाणी उंचच उंच जंगल आणि खडकाळ टेकड्या होत्या”, गुरुजी आम्हाला सांगत होते. एका दृष्टीने हा खरचं एक करिष्मा होता पण त्यासाठी आपण काय गमावलं आहे ह्याची जाणीव कित्ती लोकांना आहे? ही जंगी इमारत उभारण्यासाठी कित्तेक झाडांची बेसुमार कत्तल करण्यात आली. उंचच उंच टेकड्या जमीनदोस्त करण्यात आल्या. इमारतीचा पाया घट्ट करण्यासाठी जमीनीच्या आतपर्यंत खोदकाम करुन आपण लोखंडी बार उभारले. आणि हे असे प्रकार ह्या एकाच ठिकाणी नाहीत तर जगभर चालु आहेत. कित्ती मोठ्ठ्या प्रमाणात मनुष्याने निसर्गावर अतिक्रमण केले आहे.                                               ...

व्यसन : मोबाईल एक समस्या....

                                                                        आजच्या काळात सर्वच क्षेत्रातील तंत्रज्ञान फारच विकसित झालेले आहे. मोबाईलचे तंत्रज्ञान तर इतके वाढले आहे कि ती एक मोठी क्रांतीच झालेली जाणवते. आज प्रत्येकाच्या हाती मोबाईल आलेला आहे. घराघरातील प्रत्येक व्यक्तीजवळ मोबाईल पहावयास मिळत आहे. त्यातही विलक्षण अशी विविधता आलेली आहे. घरातल्या फोनची जागा या मोबाईलने केव्हाच घेतली आहे. अशा या मोबाईलच्या अतिरिक्त वापरामुळे कधी-कधी मोबाईल नकोस वाटू लागतो. त्यातूनच प्रश्न निर्माण होतो – ‘ मोबाईल शाप कि वरदान?’                                         पण, ज्यावेळी एखादे नवीन तंत्रज्ञान निर्माण होते तेव्हा ती मानवी सुखसोयी या दृष्टीनेच उदयास येते. मानवाचे कल्याण साधणे हाच एकमेव हेतू या तंत्रज्ञानामागे अ...

लेख क्र.3 शेतकरी राजा

                 "शेतकरी" एक अशी व्यक्ती जी आपल्या कष्टाने,मेहनतीने आपल्या शेतात राबते. वेगवेगळ्या हंगामा मध्ये वेगवेगळी पिके घेऊन त्यातून उत्पादन मिळवते आणि बाजारपेठेत नेऊन व्यापाऱ्याला किंवा ग्राहकाला विकते, अशी व्यक्ती म्हणजे शेतकरी.                                                                            शेती ही फार पुरातन काळापासून चालत आलेली आहे. आपले पूर्वज [आदिमानव] यांच्या विचारातून व युक्ती तुन या संकपलनेचा उगम झाला व तो तसाच पुढे चालत राहिला. महाराष्ट्रामध्ये शिवाजी महाराजांच्या कालखंडात शेतकऱ्याला खूप महत्वाचे स्थान होते. दिवाळीच्या सणाला प्रत्येक घरात शेतकऱ्यांसाठी [बळीराजा] प्रार्थना केली जायची, 'इडा पीडा टळो आणि बळीचं राज्य येवो' असा आवाज घराघरातून ऐकू यायचा.                  शेतकऱ्यांला शेती कर...

मातृ सुरक्षा दिन विशेष....

                               B || आई || आई म्हणजे असते एक माये चा पाझर आई ची माया असते एक आनंदाचा सागर आई म्हणजे असतो एक घराचा आधार आई विना ते गजबजलेले घरच असते निराधार आई च्या एक हाकेत ते घर सारं मावतं मन-आधारा च्या पोटी सारयांना आई च घर दावतं आई च्या हाताला असते चव लई भारी आई चा हाताने खाण्याची बातच हो न्यारी आई च्या कूशीतला तो विसावा खूप अनमोल विचलित मनाला तो नेहमीच देई समतोल आई चा राग म्हणजे बेभान ढगांचा गडगडाट अवघड असते खुप तेव्हा सापडणे आपली वाट सोसताना वेदना मुखातून एक शब्द नेहमी येई प्रेमाचा पाझर पसरून त्या वेदनेवर वेदना नाहिशी करते आई ...

My thought...

माणसाचं मनच मोठं विचित्र... त्याला एकटेपणा नकोसा असतो. पण जास्त गर्दी झाली ना, मग ती माणसांची असो की विचारांची, तो स्वतः एकांताच्या शोधात निघतो...

गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा ....

            ज्यांनी मला घडवलं या जगात लढायला , जगायला शिकवलं , अशा प्रत्येकाचा मी ऋणी आहे ! गुरु म्हणजे ज्ञानाचा उगम आणि अखंड वाहणारा झरा.. गुरु म्हणजे निष्ठा आणि कर्तव्य.. गुरु म्हणजे निस्सीम श्रद्धा आणि भक्ती.. गुरु म्हणजे विश्वास आणि वात्सल्य.. गुरु म्हणजे आदर्श आणि प्रमाणतेचे मूर्तिमंत प्रतिक.. आजपर्यंत कळत नकळतपणे ज्ञान देणाऱ्या सर्वांना , आजच्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी माझे वंदन …!! गुरू पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा..!

बैलपोळा

बैलपोळा च्या शुभेच्छा!!!! संपूर्ण महाराष्ट्रात साजरा केला जातो तो सण म्हणजे 'पोळा.' या सणाला "बैलपोळा" असेही म्हणतात. बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा हा सण आहे.ज्यांचेकडे शेती नाही ते मातीच्या बैलाची पूजा करतात.शेतीप्रधान या देशात, व शेतकर् ‍ यांत या सणाला विशेष महत्व आहे.या वेळेस पावसाचा जोर कमी झालेला असतो.शेतात पिकधान्य झुलत असते. सगळीकडे हिरवळ असते. श्रावणातले सण संपत आलेले असतात.एकुण आनंदाचे वातावरण असते. शेतकरी या दिवसाची आतुरतेने वाट पाहत असतो. शेतकर् ‍ याचा सखा, मित्र सर्जा-राजाचा आजचा दिवस मानाचा असतो. पोळ्याच्या दिवशी बैलाला गाडीला अथवा नांगराला जुंपले जात नाही तर त्याचे पूजन केले जाते. पोळ्याच्या पहाटे शेतकरी आपल्या बैलांना नदीवर नेऊन त्यांची आंघोळ घालतो. त्यांच्या अंगाला हिंगूळ लावतात. शिंगाला रंग लावून त्याच्या अंगावर झुल टाकली जाते. गळ्यात सुतापासून तयार करण्यात आलेल्या माळा तर पायात घुंगरू बांधतात. अशा नाना तर् ‍ हेने सजविण्यात येते. शेतकर् ‍ याच्या घरी बैलांचे स्वागत करण्यासाठी सुवासिनी सडा रांगोळ्या काढून त्या पाहूण्याची वाट पाहत असतात. तर घरात चु...

राजश्री छत्रपती शाहूमहाराज जयंती विशेष

                                          छ. शाहू महाराज (कोल्हापूर) : (२६ जून १८७४ –  ६ मे १९२२).  करवीर तथा कोल्हापूर   संस्थानचे थोर समाजसुधारक. प्राथमिक शिक्षण , जातिभेद-निवारण , अस्पृश्यता-निवारण इ. सुधारणांचे पुरस्कर्ते. त्यांचा जन्म कागलच्या जहागीरदार घाटगे घराण्यात जयसिंगराव आणि राधाबाई ह्या दांपत्याच्या पोटी झाला. त्यांचे पूर्वाचे नाव यशवंतराव.                              बहुजन समाज शिकून शहाणा झाल्याशिवाय त्यांचे दारिद्र , अज्ञान व अंधश्रद्धा नष्ट होणार नाहीत , हे जाणून शाहूंनी शिक्षणाच्या , विशेषतः प्राथमिक शिक्षणाच्या प्रसारावर भर दिला. त्यानुसार त्यांनी आपल्या संस्थानात सक्तीच्या मोफत प्राथमिक शिक्षणाचा कायदा केला आणि तो अमलात आणला (१९१७). प्रत्येक खेड्यात प्राथमिक शाळा सुरू केली. प्राथमिक शिक्षणावर या संस्थानात होणारा खर्च मोठा होता.           ...