मुख्य सामग्रीवर वगळा

आण्णाभाऊ साठे जयंती विशेष....


                     आण्णाभाऊ साठे यांचा जन्म १ऑगष्ट १९२० या दिवशी सांगली जिल्ह्यातील वाळवे तालुक्यात वाटेगाव या खेड्यात मातंग समाजात झाला. आणि अण्णाभाऊ साठे नावाचा क्रांती सूर्य उगवला.त्यांच्या वडिलांचे नाव भाउराव सिद्धोजी साठे व आईचे नाव वालुबाई होते. त्यांना लहान भाऊ शंकर व बहीण जाईबाई.
             बारष्याचे दिवशी त्यांचे नाव तुकाराम ठेवण्यात आले. संत तुकारामा प्रमाणे हाही तुकाराम मोठा साहित्यिक झाला. साहित्यी क्षेत्रातील चमत्कारी ठरला. अर्थात अन्नाभाउच्या बाल्यावस्थेत कोणी म्हटले असते, कि हा मुलगा आंतरराष्ट्रीय ख्याती प्राप्त करील, तर असे भाकित ठरविनार्याला वेडेच ठरविले गेले असते. त्याचे कारण म्हणजे,एक तर पददलित जातीकुळी व विलक्षण दैन्यावस्था, रोज बारा वाजताची वेळ कशी भागेल याचीच भ्रांती असायची अन्नाभाऊंची आई विचारी होती. पूर्वी जिजाबाई ने शिवबाला रामायण-महाभारतातील कथा सांगितल्या, तद्वतच वाळूबाईंनी छोट्या तुकारामाला वीर लहुजी वस्ताद, फकीरा, वीर सत्तू , पिराजी यांच्या गोष्टींचे संस्कार केले
                “माझी  मैना गावाकड ऱ्हांयली , माझ्या जीवाची होतीया काह्यली ‘ या सारख्या ठसकेबाज लावण्या आणि ‘फकीरा’ ‘वारणेचा वाघ’ ‘ माकडी ची माळ ‘ मास्तर ‘ यांसारख्या कादंबऱ्या  त्यांनी लिहिल्या. मातंग समाजात जन्मलेले अण्णाभाऊ अल्प शिक्षित असले तरी त्यांनी लिहिलेल्या कादंबऱ्या समाज मनाचा ठाव घेणार्या आहेत. त्यांच्या अंतर मनाचा तो प्रकट हुंकार आहे. समाज परिवर्तनाचा विचार मांडणारा हा साहित्यिक स्वातंत्र चळवळी च्या जनसागरात गुंतलेला लढाऊ माणूस अण्णांनी आपल्या लेखणीतून उभा केला. ग्रामीण, पददलित, आणि लाचारीचे जिने जगणारी माणसे त्यांनी आपल्या खास शैलीत उभी केली.
                 फकीरा प्रमाणे मातंग असणारा नायक , एक अजस्त्र ताकदीचा व धैर्याचा महामेरू, भारतीय स्वातंतत्र्य लढ्याच्या रनांगणात  दिनद्लितांच्या व उपेक्षितांच्या वतीने लढणारा नायक म्हणून त्यांनी ‘ फकीरात ‘ केला फकीरा हि कादंबरी त्याकाळात फार प्रसिद्ध झालेल्या सर्वोत्कृष्ट ठरल्या.पस्तीस कादंबर्या, तीन नाटके, अकरा लोकनाट्ये,तेरा कथा संग्रह आणि सात चित्रपट कथा लिहिणार्या अण्णाभाऊनि फक्कड लावण्याही लिहिल्या. शाहीर गवानकरांच्या ‘ लालबावटा ‘ कलापथकां द्वारा अनेक तमाशेही केले.जगण्यासाठी लढणार्या माणसांचे चित्रण करणार्या अन्नाभाउंनी “मुंबई नगरी बडीबांका,जशी रावणाची लंका वाजतोय डंका चौहुमुलुखी” अश्या शब्दात मुंबईचे चित्र रेखाटले.

                                   
               डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे ” मार्क्सवाद भाकरीचा प्रश्न सोडवील पण माणूस म्हणून जगण्याचा प्रश्न शिल्लक राहतोच आणि मला भाकरीपेक्षा इज्जत आणि स्वाभिमान प्यारा आहे. “या विचाराने अण्णाभाऊ भाराऊन गेले. हा स्वाभिमान त्यांनी निर्माण केलेल्या पात्रांतून आपले अस्तित्व दाखवू लागला. अन्नाभाउंनी उभ्या आयुष्यात मुख्यत: दोन गोष्टींचा तिटकारा केला. एक म्हणजे श्रीमंत लोकांकडून होणारे गरीबांचे शोषण आणि अस्पृश्य बांधवामची होणारी धार्मिक, सामाजिक पिळवणूक. अनाभाउंनि या गोष्टीवर आपल्या लेखणीने सतत कोरडे ओढले, प्रहार केले. जनसामांन्यांच्या या लोकशाहिराचे दिनांक १८ जुलै १९६९ रोजी निधन झाले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पहिली माझी ओवी ग, सावित्रीच्या बुद्धीला.

    पहिली माझी ओवी ग, सावित्रीच्या बुध्दीला स्त्रियांच्या शिक्षणाचा, पाया तू घातला अशिक्षित अडाणी तू, पतीपाशी शिकली मुलींसाठी पहिली, शाळा तू काढली दुसरी ओवी गाईली, तुझ्या ग धैर्याला दगडगोटे खाऊनी, चालवली तू शाळा घराबाहेर काढिले, गुंडांनी अडविले धीराने तोंड दिले, सगळ्या त्रासाला तिसरी माझी ओवी ग, तुझ्या मोठया मनाला फसलेल्या विधवेचा, सांभाळ तू केला अबला नि अनाथांचे, मायबाप होऊन यशवंत बाळाला, दत्तक घेतला चौथी ओवी गाईली, तुझ्या थोर हृदयाला माणुसकीचा झरा ज्यातं, नित्य ग वाहिला जोतिबांची सावली, नाही तू राहिली सत्यधर्म प्रकाशात, तेजानं तळपली दु:खितांच्या सेवेत, देह तू ठेविला स्मरण तुझे करुनी, वसा मी घेतला भगिनींना जागवीन, संघटीत करीन ज्ञानज्योत लावीन, हेच तुला नमन..                                      धन्यवाद...

मुलगी वाचवा देश वाचवा !

              आपल्या देशात मुलींची संख्या मुलांच्या तुलनेत दिवसेंदिवसघटताना दिसत आहे. हे असे लिहण्याला अनेक सामाजिक सांस्कृतिकआणि वैचारिक गोष्टी कारणीभूत आहेत. आज आपल्या देशाच्या जडणघडणीत स्त्रियांचामोलाचा वाटा आहे. पण भविष्यात तो पुरूषांच्या बरोबरीचा असणार आहे. भविष्यात आपला देश जर उत्तमरित्या घडवायचा असेल तर मुली वाचायला हव्यात. मुलींची मुलांच्यातुलनेतील संख्या कशी वाढेल याकडे गांर्भियाने लक्ष दयायला हवे. आपल्या देशातस्त्री-पुरूष समानतेचा फक्त गाजावाजा होतोय पण ती समानता प्रत्यक्षात आलेली कोठेही पाहायला मिळत नाही. त्यामुळेच देशातील स्त्रियांची संख्या पुरूषांच्या तुलनेतकमी होत चाललेली आहे. बालमृत्यू होण्याच्या घटनेतही मुलींच बालमृत्यू होण्याचप्रमाण अधिक आहे.   समाजात मुलींच्या संगोपनात हलगर्जीपणा केला जातो हे सत्यनाकारता येणार नाही इतकच नव्हे तर समाजातील काही घटकात मुलीला जन्म देणार्या आईचीही उपासमार होताना दिसते. आज ही आपल्या देशातील बर्याचश्या भागातील स्त्रियासुशिक्षीत सुसंस्कृत असतानाही पुरूषांच्या हातातील खेळणे झाले असल्याचे दिसतात त्यंच...

राष्ट्रमाता सावित्रीबाई फुले

                         राष्ट्रमाता  सावित्रीबाई फुले  क्रांतिज्योती राष्ट्रमाता सावित्रीबाई फुलेंचा जन्म ३ जानेवारी १८३१ ला नायगाव येथे खंडोजी नेवसे पाटील यांच्या त्या कन्यारत्न . १८४० साल महात्मा जोतीबा १३ वर्षाचे व सावित्रीआई ९वर्षाच्याअसतांना ह्या दोन तेजस्वी ज्योतींचा संयोग म्हणजेच त्यांचा विवाहझाला पुढच्या आयुष्यात दोघांच्या हातुन पुरोगामी,क्रांतीकारक,शुद्रातिशुद्रांच्या स्थितीत बद्दल, स्त्रीयांचे शैक्षणिक व सामाजिक जागृतीचे महान क्रांतिकारक कार्य १८४८ला मुलींन साठी आणी नंतर शुद्रांसाठी पहीली शाळा काढुन जोतीबांनी ज्ञानाचा दिप उजळला त्यातली ज्योत होते जोतीबा व तेल झाल्या सावित्रीआई आणी त्यांनी हा सारा भारत देशाला प्रकाशमान करुन उजळविले. महारवाडयात स्थापन केलेल्या शाळेत सगुणाबाई व सावित्रीआई कडुन शिक्षिकसेवेचे महान योगदान लाभले.सोबतच ज्योतीबांनी भिडे वाडयातल्या मुलींन च्या शाळेत त्यांना विनावेतन शिक्षिकेचे असे"पातक" कार्य करित होत्या.त्या शाळेत जातांना भट-ब्राम्हणा कडुन त्यांना छळले जाई त्यांना खडे,गोटे दगड ...