मुख्य सामग्रीवर वगळा

शिक्षक दीन विशेष.....

 

                                    

                डॉ. राधाकृष्णन यांचा जन्मदिवस शिक्षक दिन (५ सप्टेंबर) म्हणून साजरा केला जातो.  छोट्या बालकाचे देशाचा उत्कृष्ट नागरिक म्हणून परिवर्तन करण्याचे कार्य शिक्षकाला कारायचे असते. राष्ट्रउभारणीच्या कार्यात शिक्षकाचा मोठा वाटा असतो. डॉ. राधाकृष्णनयांनी एके  ठिकाणी म्हटले आहे - "ज्या देशात निस्वार्थी निरपेक्ष व सेवावृत्तीने कोणतेही कार्य होते तेंव्हा त्या देशातील शिक्षकच खरे सन्मानाला पात्र होतात." आणि म्हणूनच त्यांच्या जन्मदिनी शिक्षकांचा सन्मान केला जातो.

               वैदिक संस्कृतीने शिक्षकाला अत्युच्च स्थान दिले आहे. गुरुला देवाच्या स्थानी मानले गेले आहे. जो देतो तो देव. गुरुंनी किंवा शिक्षकांनी कोणत्याही परतफेडीची  अपेक्षा न करता आपल्या जवळचे ज्ञान इतरांना द्यावे ही अपेक्षा समाजाची गुरु कडून असते. जे जे आपणासि ठावे |  ते  ते दुसर्यांस सांगावे |  शहाणे करून सोडावे सकलजन | अशी वृत्ती शिक्षकाची हवी. त्यामुळे मुळात शिक्षकाकडे माहितीचा खजिना असणे आवश्यक आहे. निदान ही माहिती कोठून मिळवायची याचे मार्गदर्शन तरी आजच्या काळात शिक्षकाला करता आले पाहिजे. आज चहुबाजूंनी माहितीचा प्रचंड स्फोट होत आहे. नवा इतिहास घडत आहे. भौगोलिक बदल होत आहेत. वैज्ञानिक शोध लागत आहेत. थोडक्यात सामाजिक ऐतिहासिक, वैज्ञानिक, भौगोलिक असे परिवर्तन जागतिक पातळीवरच होत आहे. त्याची माहिती शिक्षकाने करून घेणे गरजेचे आहे. पुर्वीचा विद्यार्थी आणि आजचा विद्यार्थी यात महदंतर आहे. पूर्वी गावात शिक्षक जे सांगेल तेच खरे ज्ञान , अशी परिस्थिती होती. कोर्या करकरीत  मातीच्या गोळ्याला आकार देण्याचे काम आई, वडील, शिक्षक करीत असत. आज विद्यार्थ्याच्या मनाची पाटी कोरी नाही हे लक्षात घेणे गरजेचे आहे. दूरदर्शन, वर्तमानपत्रे, चित्रपट, नाटके, जाहिराती, मासिके, संगणक, मोबाइल आणि भोवतालचा परिसर यातून विद्यार्थी शिक्षकांच्या आधीच प्रचंड माहिती मिळवतो. त्यातील कोणती माहिती विद्यार्थ्याच्या मनःपटलावर पक्की करायची व कोणती काढून टाकायची याचे भान शिक्षकाने  ठेवले पाहिजे. त्या दृष्टीने शिक्षकाचे कार्य आज खरोखरच अवघड बनत चालले आहे. एखादी पूर्णत: नवीन निर्मिती करणे जितके सोपे; तितके जुन्याची मोडतोड करून चांगले काही बनवणे  अवघड असते. म्हणून विद्यार्थ्याला माहीत नव्हते, ते सांगणे म्हणजे शिक्षण नव्हे तर त्याच्याजवळील माहितीच्या साठ्याचा त्याने कसा उपयोग करून घ्यावा यचे मार्गदर्शन करून; त्याला योग्य मार्गाने  आचरण करयला लावणे; म्हणजे शिक्षण हे आज लक्षात घेणे गरजेचे आहे .एक निकृष्ट शिक्षक 'सांगत जातो.' सामान्य शिक्षक 'स्पष्टिकरण करतो.' चांगला शिक्षक 'प्रात्यक्षिक' करतो. तर खरा शिक्षक 'प्रेरणा' देतो.  आणि म्हणून विद्यार्थ्याला प्रेरणा देण्यासाठी शिक्षकाने स्वतः उत्साहाने सतत शिकत राहिले पाहिजे शिक्षकाने विद्यार्थ्याला स्वतःला ओळखयला शिकवले पाहिजे. त्याच्यातील त्रुटी, त्याच्या क्षमता त्याला दाखवून विकासाचा मार्ग दाखवण्याचे काम शिक्षकांनी करावे. आज शिक्षक केवळ वर्गात शिकवणारी, अभ्यासक्रम  पूर्ण करणारी व्यक्ती न रहाता विद्यार्थ्यांच्या व्यकिमत्त्वाच्या सर्वांगीण विकासाला मदत करणारी जबाबदार व्यक्ती बनायला हवी. असा विद्यार्थी घडवण्याची जबबदारी पार पाडण्यासाठी प्रथम शिक्षकाने स्वतःच स्वतःला घडवावे म्हणजे स्वतः शिक्षकाने चारित्र्यवान असावे.तरच तो चारित्र्यवान विद्यार्थी घडवू शकेल.

              शिक्षक म्हटले की मला आठवतात, देशप्रेमाने भारलेले; देशस्वातंत्र्याच्या ध्येयाने प्रेरीत झालेले लोकमान्य  टिळक आणि आगरकर. शिक्षक म्हटले की मला आठवतात, रंजल्या गांजल्या समाजाला उन्नती अवस्थेला नेण्यासाठी झटणारे तुकाराम , ज्ञानेश्वर, एकनाथ आणि रामदासादि संत. शिक्षक म्हटले की मला आठवतात आदिवासींच्या शिक्षणासाठी झटणार्या अनुताई वाघ. आज समाजाला अशा शिक्षकांची  खरोखर गरज आहे. भ्रष्टाचार, व्यसनाधिनता, अंधश्रद्धा, दांभिकपणा, अन्याय, अत्याचार, या सार्वांची पाळेमुळे उखडून टाकण्यास समर्थपणे उभे रहाणारे, समाजाला अगदी हीन अवस्थेप्रत नेण्यास कारणीभूत ठरलेले नेते, अभिनेते व तथाकथित राजकारणी, सनदी अधिकारी यांना निर्भयपणे धडा शिकावण्यास सज्ज असलेले,  दिशाहीन बनलेल्या विद्यार्थांच्या पाठीवर प्रेमळ हात फिरवून त्यांना मार्ग दाखविणारे आणि त्यांच्यावरिल अन्यायाला विरोध करण्यास त्यांना सहकर्याचा हात देणारे, असे शिक्षक आज मी शोधते आहे. पण क्वचित कुठे असे काजवे मिणमिणताना दिसतात. बाकी सारे पैशाच्या मागे लागलेले शिक्षक व्यावसायिकच नजरेला पडताहेत. या सर्व मिणमिणत्या काजव्यांनी एकत्र येऊन समाजाची घडी व्यवस्थित बसवण्याचा प्रयत्न करावा आणि आजचा शिक्षकदिन चिंतन दिन म्हणून साजरा करून समाजात आपले स्थान सर्वात उच्च बनवण्यासाठी कार्यरत व्हावे; हीच  विनंती...

                                               धन्यवाद....



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पहिली माझी ओवी ग, सावित्रीच्या बुद्धीला.

    पहिली माझी ओवी ग, सावित्रीच्या बुध्दीला स्त्रियांच्या शिक्षणाचा, पाया तू घातला अशिक्षित अडाणी तू, पतीपाशी शिकली मुलींसाठी पहिली, शाळा तू काढली दुसरी ओवी गाईली, तुझ्या ग धैर्याला दगडगोटे खाऊनी, चालवली तू शाळा घराबाहेर काढिले, गुंडांनी अडविले धीराने तोंड दिले, सगळ्या त्रासाला तिसरी माझी ओवी ग, तुझ्या मोठया मनाला फसलेल्या विधवेचा, सांभाळ तू केला अबला नि अनाथांचे, मायबाप होऊन यशवंत बाळाला, दत्तक घेतला चौथी ओवी गाईली, तुझ्या थोर हृदयाला माणुसकीचा झरा ज्यातं, नित्य ग वाहिला जोतिबांची सावली, नाही तू राहिली सत्यधर्म प्रकाशात, तेजानं तळपली दु:खितांच्या सेवेत, देह तू ठेविला स्मरण तुझे करुनी, वसा मी घेतला भगिनींना जागवीन, संघटीत करीन ज्ञानज्योत लावीन, हेच तुला नमन..                                      धन्यवाद...

मुलगी वाचवा देश वाचवा !

              आपल्या देशात मुलींची संख्या मुलांच्या तुलनेत दिवसेंदिवसघटताना दिसत आहे. हे असे लिहण्याला अनेक सामाजिक सांस्कृतिकआणि वैचारिक गोष्टी कारणीभूत आहेत. आज आपल्या देशाच्या जडणघडणीत स्त्रियांचामोलाचा वाटा आहे. पण भविष्यात तो पुरूषांच्या बरोबरीचा असणार आहे. भविष्यात आपला देश जर उत्तमरित्या घडवायचा असेल तर मुली वाचायला हव्यात. मुलींची मुलांच्यातुलनेतील संख्या कशी वाढेल याकडे गांर्भियाने लक्ष दयायला हवे. आपल्या देशातस्त्री-पुरूष समानतेचा फक्त गाजावाजा होतोय पण ती समानता प्रत्यक्षात आलेली कोठेही पाहायला मिळत नाही. त्यामुळेच देशातील स्त्रियांची संख्या पुरूषांच्या तुलनेतकमी होत चाललेली आहे. बालमृत्यू होण्याच्या घटनेतही मुलींच बालमृत्यू होण्याचप्रमाण अधिक आहे.   समाजात मुलींच्या संगोपनात हलगर्जीपणा केला जातो हे सत्यनाकारता येणार नाही इतकच नव्हे तर समाजातील काही घटकात मुलीला जन्म देणार्या आईचीही उपासमार होताना दिसते. आज ही आपल्या देशातील बर्याचश्या भागातील स्त्रियासुशिक्षीत सुसंस्कृत असतानाही पुरूषांच्या हातातील खेळणे झाले असल्याचे दिसतात त्यंच...

राष्ट्रमाता सावित्रीबाई फुले

                         राष्ट्रमाता  सावित्रीबाई फुले  क्रांतिज्योती राष्ट्रमाता सावित्रीबाई फुलेंचा जन्म ३ जानेवारी १८३१ ला नायगाव येथे खंडोजी नेवसे पाटील यांच्या त्या कन्यारत्न . १८४० साल महात्मा जोतीबा १३ वर्षाचे व सावित्रीआई ९वर्षाच्याअसतांना ह्या दोन तेजस्वी ज्योतींचा संयोग म्हणजेच त्यांचा विवाहझाला पुढच्या आयुष्यात दोघांच्या हातुन पुरोगामी,क्रांतीकारक,शुद्रातिशुद्रांच्या स्थितीत बद्दल, स्त्रीयांचे शैक्षणिक व सामाजिक जागृतीचे महान क्रांतिकारक कार्य १८४८ला मुलींन साठी आणी नंतर शुद्रांसाठी पहीली शाळा काढुन जोतीबांनी ज्ञानाचा दिप उजळला त्यातली ज्योत होते जोतीबा व तेल झाल्या सावित्रीआई आणी त्यांनी हा सारा भारत देशाला प्रकाशमान करुन उजळविले. महारवाडयात स्थापन केलेल्या शाळेत सगुणाबाई व सावित्रीआई कडुन शिक्षिकसेवेचे महान योगदान लाभले.सोबतच ज्योतीबांनी भिडे वाडयातल्या मुलींन च्या शाळेत त्यांना विनावेतन शिक्षिकेचे असे"पातक" कार्य करित होत्या.त्या शाळेत जातांना भट-ब्राम्हणा कडुन त्यांना छळले जाई त्यांना खडे,गोटे दगड ...