मुख्य सामग्रीवर वगळा

साक्षरता दीन विशेष...

 


                भारतात, राष्ट्रीय साक्षरता मिशनच्या अनुसार जर एखादी व्यक्ती आपले नाव लिहु आणि वाचु शकत असेल तर त्या व्यक्तीला साक्षर  जाते. वास्तवीक १९८८ मध्ये ‘राष्ट्रीय साक्षरता मिशनची’ सुरुवात झाली होती.                                                    पुर्वीच्या काळी निरक्षर लोकांची मोठ्या प्रमाणात फसवणुक होतं होती. मुख्यतः सावकारांकडुन. अश्या लोकांच्या निरक्षरतेचा फायदा घेउन त्यांच्याकडुन अंगठ्यांचे ठसे घेउन मोठ्याप्रमाणात जमीनी, आर्थीक मालमत्ता लाटण्यात आल्या. पुढे सरकारकडुन सावकारांवर बंधंन आली आणि अश्याप्रकारांना आळा बसला. असे असले तरी निरक्षरतेमुळे अश्या समाजाची वाढच खुंटल्यासारखे झाले. व्यवहारी जगात प्रगतीचे अनेक मार्ग उघडे असतानाही असा निरक्षर समाज पारंपारीक व्यवहारांमध्येच गुंतुन पडला त्यामुळे त्यांचे आर्थीक प्रगतीचे मार्ग खुंटले. बालमजुरी, अल्पवयीन गुन्हेगारी, रस्त्यांवर भिक-मागणारे अनेक लहान-लहान मुले यांच्या प्रमाणात निरक्षरतेमुळे वाढ झाली. “एक स्त्री शिकली तर अख्खं कुटुंब शिकतं, सुशिक्षित होतं.” असे ज्योतीबा फुले म्हणाले होते. परंतु काळाच्या ओघात त्यांचे विचारही तितकेसे तग धरु शकले नाहीत. आजही निरक्षरतेमध्ये महिलांचे प्रमाण लक्षणीय आहे. निरक्षर पालकांमुळे कुटुंब कल्याण, वाढती लोकसंख्या, बेरोजगारी, अंधश्रध्दा अश्या अनेक गोष्टी वाढत जातात ज्या इतर समाजाच्या प्रगतीच्या आड येत आहेत. महासत्तेच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या भारत देश्याच्या शक्तीला पोखरुन काढत आहेत.                                                                                 लहान मुलांच्या अंगी प्रचंड चैतंन्य असते. त्याला साक्षरतेने योग्य आकार दिला तर हीच मुले पुढे स्वतःचे आणि पर्यायाने देश्याचे भवित्यव्य उज्वल करतील. ‘शेतकर्य़ांच्या आत्महत्या’ चर्चेचा विषय ठरत असतानाच, एखादा शिकलेला साक्षर शेतकरी आपल्या हुशारीचा, ज्ञानाचा वापर करुन पर्यायी मार्ग शोधुन काढतो आणि स्वतःच्या पायावर भक्कम उभा राहीलेला दिसुन येतो. एखादे शिकलेले कुटुंब आपल्या आजारी पाल्याला अंधश्रध्देच्या आहारी जाऊन एखाद्या भोंदु-बाबाकडे न न्हेता गावातील डॉक्टरांकडे घेउन जाते आणि वेळीच औषधं मिळाल्याने त्याचा जिव वाचवताना दिसते. वर्षानुवर्ष दारीद्रात अडकलेल्या कुटुंबातील एखादी मुलगी शिकुन मोठेपणी स्वबळावर उभी रहातेच, परंतु पर्यायाने तिचे कुटुंबही दारीद्रातुन बाहेर पडते. असे एक ना अनेक उदाहरणं आपल्या आजुबाजुला घडताना पहातो. हे सर्व साकार होते ते केवळ आणि केवळ साक्षरतेमुळेच.

                  आज सरकारने केवळ मुलांसाठीच नाही तर महिला आणि जेष्ठांसाठीही साक्षरता मोहीम हाती घेतली आहे. गावोगावी शाळा उभ्या रहात आहेत. मुलींच्या शिक्षणासाठी फि-माफीच्या योजन्या राबवल्या जात आहेत. घरची परिस्थीती बेताची असल्याने दिवसभर कष्ट करुन शिकणासाठी रात्रीच्या शाळासुध्दा सुरु केल्या आहेत, असं म्हणतात “वाचाल तर वाचाल”. निरक्षरता दुर करण्याची जबाबदारी फक्त सरकारचीच नाही तर तुमच्या आमच्यासारख्या साक्षरांची सुध्दा आहे. सरकारने ह्या साक्षरतेच्या अभियानात एक पाऊल पुढे टाकले आहे, निरक्षर समाजाने दोन पावलं पुढे टाकण्याची गरज आहेच, पण त्याचबरोबर गरज आहे ती आपल्या सारख्यांनी आजुबाजुला वावरणाऱ्या निरक्षर समाजाला साक्षरतेचे महत्व पटवुन देण्याची, त्यांना साक्षर बनवण्याची.  

                                                    धन्यवाद.......

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पहिली माझी ओवी ग, सावित्रीच्या बुद्धीला.

    पहिली माझी ओवी ग, सावित्रीच्या बुध्दीला स्त्रियांच्या शिक्षणाचा, पाया तू घातला अशिक्षित अडाणी तू, पतीपाशी शिकली मुलींसाठी पहिली, शाळा तू काढली दुसरी ओवी गाईली, तुझ्या ग धैर्याला दगडगोटे खाऊनी, चालवली तू शाळा घराबाहेर काढिले, गुंडांनी अडविले धीराने तोंड दिले, सगळ्या त्रासाला तिसरी माझी ओवी ग, तुझ्या मोठया मनाला फसलेल्या विधवेचा, सांभाळ तू केला अबला नि अनाथांचे, मायबाप होऊन यशवंत बाळाला, दत्तक घेतला चौथी ओवी गाईली, तुझ्या थोर हृदयाला माणुसकीचा झरा ज्यातं, नित्य ग वाहिला जोतिबांची सावली, नाही तू राहिली सत्यधर्म प्रकाशात, तेजानं तळपली दु:खितांच्या सेवेत, देह तू ठेविला स्मरण तुझे करुनी, वसा मी घेतला भगिनींना जागवीन, संघटीत करीन ज्ञानज्योत लावीन, हेच तुला नमन..                                      धन्यवाद...

मुलगी वाचवा देश वाचवा !

              आपल्या देशात मुलींची संख्या मुलांच्या तुलनेत दिवसेंदिवसघटताना दिसत आहे. हे असे लिहण्याला अनेक सामाजिक सांस्कृतिकआणि वैचारिक गोष्टी कारणीभूत आहेत. आज आपल्या देशाच्या जडणघडणीत स्त्रियांचामोलाचा वाटा आहे. पण भविष्यात तो पुरूषांच्या बरोबरीचा असणार आहे. भविष्यात आपला देश जर उत्तमरित्या घडवायचा असेल तर मुली वाचायला हव्यात. मुलींची मुलांच्यातुलनेतील संख्या कशी वाढेल याकडे गांर्भियाने लक्ष दयायला हवे. आपल्या देशातस्त्री-पुरूष समानतेचा फक्त गाजावाजा होतोय पण ती समानता प्रत्यक्षात आलेली कोठेही पाहायला मिळत नाही. त्यामुळेच देशातील स्त्रियांची संख्या पुरूषांच्या तुलनेतकमी होत चाललेली आहे. बालमृत्यू होण्याच्या घटनेतही मुलींच बालमृत्यू होण्याचप्रमाण अधिक आहे.   समाजात मुलींच्या संगोपनात हलगर्जीपणा केला जातो हे सत्यनाकारता येणार नाही इतकच नव्हे तर समाजातील काही घटकात मुलीला जन्म देणार्या आईचीही उपासमार होताना दिसते. आज ही आपल्या देशातील बर्याचश्या भागातील स्त्रियासुशिक्षीत सुसंस्कृत असतानाही पुरूषांच्या हातातील खेळणे झाले असल्याचे दिसतात त्यंच...

राष्ट्रमाता सावित्रीबाई फुले

                         राष्ट्रमाता  सावित्रीबाई फुले  क्रांतिज्योती राष्ट्रमाता सावित्रीबाई फुलेंचा जन्म ३ जानेवारी १८३१ ला नायगाव येथे खंडोजी नेवसे पाटील यांच्या त्या कन्यारत्न . १८४० साल महात्मा जोतीबा १३ वर्षाचे व सावित्रीआई ९वर्षाच्याअसतांना ह्या दोन तेजस्वी ज्योतींचा संयोग म्हणजेच त्यांचा विवाहझाला पुढच्या आयुष्यात दोघांच्या हातुन पुरोगामी,क्रांतीकारक,शुद्रातिशुद्रांच्या स्थितीत बद्दल, स्त्रीयांचे शैक्षणिक व सामाजिक जागृतीचे महान क्रांतिकारक कार्य १८४८ला मुलींन साठी आणी नंतर शुद्रांसाठी पहीली शाळा काढुन जोतीबांनी ज्ञानाचा दिप उजळला त्यातली ज्योत होते जोतीबा व तेल झाल्या सावित्रीआई आणी त्यांनी हा सारा भारत देशाला प्रकाशमान करुन उजळविले. महारवाडयात स्थापन केलेल्या शाळेत सगुणाबाई व सावित्रीआई कडुन शिक्षिकसेवेचे महान योगदान लाभले.सोबतच ज्योतीबांनी भिडे वाडयातल्या मुलींन च्या शाळेत त्यांना विनावेतन शिक्षिकेचे असे"पातक" कार्य करित होत्या.त्या शाळेत जातांना भट-ब्राम्हणा कडुन त्यांना छळले जाई त्यांना खडे,गोटे दगड ...