मुख्य सामग्रीवर वगळा

नागपंचमी विशेष......


सर श्रावणाची सांगे, गोड गुपित कानांत ।
झुला फांदीवरचा गं, श्रावणाचे गातो गीत ।
                 ह्या ओळी ऐकल्या, की लगेच आपल्या डोळ्यापुढे श्रावण पंचमी साठी झाडावर बांधलेले झोके आठवतात. झोक्यांवर झुलणार्या मुली आठवतात. दारीफेर धरून चाललेली नागपंचमी गाणी आठवतात. “चल ग सखे वारूळाला - नागोबाला पुजायला…” या ओळी ओठावर येतात. खरं ना? बरोबरच आहे. कारण श्रावण महिन्यातला हा पहिला सण नागपंचमी. सर्व स्त्रिया, मुली ह्यांना अगदी हा हवासा वाटणारा सण. सर्वच मोठ्या उत्साहने साजरा केला जातो. ह्या दिवशी स्त्रिया नागदेवतेची मनापासून भक्तीभावाने पूजा करतात त्या नागाला दूध पाजतात. शेतकरी ह्या दिवशी शेत नांगरत नाही. 

स्त्रिया भाजी चिरत नाहीत, तवा ठेवत नाहीत.
नागपंचमीचा सण हा त्या नागदेवतेबद्दल कृतज्ञता आदर व प्रेम व्यक्त करण्याचा दिवस. ह्या सणाला देवापुढे पाटावर गंधाने नाग नागोबा-नागीण तिची पिल्ले काढतात. त्याची पूजा करतात. नागस्तोत्र म्हणतात. दूध, लाह्या ह्यांचा नैवेद्य दाखवतात आणि पूजा करून प्रार्थना करतात की हे नागराजा! आमचे संरक्षण कर, कृपा कर.
                इथं आठवण होते ती आई, आजी ह्यांच्याकडून ऐकलेल्या एका गोष्टीची, तशा तर ह्या सणाबद्दल अनेक लोककथा प्रचलित आहेत. पण आठवणीत राहिलेली ती गोष्ट अशी की..
एका गावात एक शेतकरी रहात होता. त्याला एक मुलगी होती. तिचं नाव सुशिला. ती गुणी सुस्वाभावी अन् लाघवी होती. ती सर्वांवर प्रेम करायची. सर्वांचा आदर करायची. आपल्या सेवाभावी वृत्तीनं ती सर्वांची मनं सहजतेन जिंकून घ्यायची. एकदा काय झालं. तो शेतकरी आपले शेत नांगरत असताना नांगराचा फाळ एका वारूळाला लागला. त्या वारूळातली नागोबाची पिल्लं त्यामुळे जखमी झाली. एक-दोन मेली सुद्धा. ह्या गोष्टीचा नागोबाला फार राग आला. आपल्या पिल्लांना मारणार्या त्या शेतकर्याच्या मुलांना मारण्यासाठी नाग-नागिणीने शेतकर्याच्या घरी आपला मोर्चा वळवला. तो दोघं शेतकर्याच्या घरी आली. तो काय?
                  शेतकर्याची मुलगी सुशिला ही आपल्या धाकट्या भावंडासह नागोबाची पूजा करत होती. तो दिवस होता नागपंचमीचा. सुशिलेनं पाटावर नाग-नागिण तिची पिल्लंही गंधानी काढली होती. त्या सर्वांना हळद-कुंकू, आघाडा दुर्वा-फुले वाहिली होती. दूध लाह्या पुढ्यांत ठेवल्या होत्या. हात जोडून सुशिला सांगेल तशी ती भावंड नागराजाला प्रार्थना करत होती की - “हे नागराजा! आम्ही तुझी पूजा करतोय. तुझा आदर करतोय पण जर चुकून माकून जरी आमच्या कोणाच्या हातून तुला किंवा तुझ्या पिल्लांना जर काही इजा झाली असेल. तुला कुणी त्रास दिला असेल तर हे नागराजा तू आम्हाला क्षमा कर. आमच्यावर दया कर. कृपा कर. आम्हाला सुखी ठेव.” सुशिला आणि तिची भावंडांनी मनापासून केलेली प्रार्थना ऐकली मात्र… आणि सूडाच्या भावनेनं शेतकर्याच्या घरी आलेल्या नाग-नागिणीचं मनं परिवर्तन प्रसन्न होत त्यांना मंगल आशिर्वाद दिले. अपराधी शेतकर्यालाही शासन न करता दयेच वरदान देत नाग-नागिणीची जोडी निघून गेली.
                गोष्ट छोटीच पण त्यातला बोध मात्र मोठा कि प्रेमानं कुणालाही जिंकता येतं. दुष्ट वृत्तीचं सद्प्रवृत्तीत परिवर्तन होतं कारण निरपेक्ष प्रेमात मोठी ताकद असते. पंचमीचा हा सण माणूस आणि प्राणी ह्यांच्यात एक नवा प्रेमबंधाचा धागा विणून जातो हेच खरं…….!

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पहिली माझी ओवी ग, सावित्रीच्या बुद्धीला.

    पहिली माझी ओवी ग, सावित्रीच्या बुध्दीला स्त्रियांच्या शिक्षणाचा, पाया तू घातला अशिक्षित अडाणी तू, पतीपाशी शिकली मुलींसाठी पहिली, शाळा तू काढली दुसरी ओवी गाईली, तुझ्या ग धैर्याला दगडगोटे खाऊनी, चालवली तू शाळा घराबाहेर काढिले, गुंडांनी अडविले धीराने तोंड दिले, सगळ्या त्रासाला तिसरी माझी ओवी ग, तुझ्या मोठया मनाला फसलेल्या विधवेचा, सांभाळ तू केला अबला नि अनाथांचे, मायबाप होऊन यशवंत बाळाला, दत्तक घेतला चौथी ओवी गाईली, तुझ्या थोर हृदयाला माणुसकीचा झरा ज्यातं, नित्य ग वाहिला जोतिबांची सावली, नाही तू राहिली सत्यधर्म प्रकाशात, तेजानं तळपली दु:खितांच्या सेवेत, देह तू ठेविला स्मरण तुझे करुनी, वसा मी घेतला भगिनींना जागवीन, संघटीत करीन ज्ञानज्योत लावीन, हेच तुला नमन..                                      धन्यवाद...

मुलगी वाचवा देश वाचवा !

              आपल्या देशात मुलींची संख्या मुलांच्या तुलनेत दिवसेंदिवसघटताना दिसत आहे. हे असे लिहण्याला अनेक सामाजिक सांस्कृतिकआणि वैचारिक गोष्टी कारणीभूत आहेत. आज आपल्या देशाच्या जडणघडणीत स्त्रियांचामोलाचा वाटा आहे. पण भविष्यात तो पुरूषांच्या बरोबरीचा असणार आहे. भविष्यात आपला देश जर उत्तमरित्या घडवायचा असेल तर मुली वाचायला हव्यात. मुलींची मुलांच्यातुलनेतील संख्या कशी वाढेल याकडे गांर्भियाने लक्ष दयायला हवे. आपल्या देशातस्त्री-पुरूष समानतेचा फक्त गाजावाजा होतोय पण ती समानता प्रत्यक्षात आलेली कोठेही पाहायला मिळत नाही. त्यामुळेच देशातील स्त्रियांची संख्या पुरूषांच्या तुलनेतकमी होत चाललेली आहे. बालमृत्यू होण्याच्या घटनेतही मुलींच बालमृत्यू होण्याचप्रमाण अधिक आहे.   समाजात मुलींच्या संगोपनात हलगर्जीपणा केला जातो हे सत्यनाकारता येणार नाही इतकच नव्हे तर समाजातील काही घटकात मुलीला जन्म देणार्या आईचीही उपासमार होताना दिसते. आज ही आपल्या देशातील बर्याचश्या भागातील स्त्रियासुशिक्षीत सुसंस्कृत असतानाही पुरूषांच्या हातातील खेळणे झाले असल्याचे दिसतात त्यंच...

राष्ट्रमाता सावित्रीबाई फुले

                         राष्ट्रमाता  सावित्रीबाई फुले  क्रांतिज्योती राष्ट्रमाता सावित्रीबाई फुलेंचा जन्म ३ जानेवारी १८३१ ला नायगाव येथे खंडोजी नेवसे पाटील यांच्या त्या कन्यारत्न . १८४० साल महात्मा जोतीबा १३ वर्षाचे व सावित्रीआई ९वर्षाच्याअसतांना ह्या दोन तेजस्वी ज्योतींचा संयोग म्हणजेच त्यांचा विवाहझाला पुढच्या आयुष्यात दोघांच्या हातुन पुरोगामी,क्रांतीकारक,शुद्रातिशुद्रांच्या स्थितीत बद्दल, स्त्रीयांचे शैक्षणिक व सामाजिक जागृतीचे महान क्रांतिकारक कार्य १८४८ला मुलींन साठी आणी नंतर शुद्रांसाठी पहीली शाळा काढुन जोतीबांनी ज्ञानाचा दिप उजळला त्यातली ज्योत होते जोतीबा व तेल झाल्या सावित्रीआई आणी त्यांनी हा सारा भारत देशाला प्रकाशमान करुन उजळविले. महारवाडयात स्थापन केलेल्या शाळेत सगुणाबाई व सावित्रीआई कडुन शिक्षिकसेवेचे महान योगदान लाभले.सोबतच ज्योतीबांनी भिडे वाडयातल्या मुलींन च्या शाळेत त्यांना विनावेतन शिक्षिकेचे असे"पातक" कार्य करित होत्या.त्या शाळेत जातांना भट-ब्राम्हणा कडुन त्यांना छळले जाई त्यांना खडे,गोटे दगड ...