मुख्य सामग्रीवर वगळा

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साँग...

 

                                   

                      छाती ठोक हे सांगू जगाला

छाती ठोक हे सांगू जगाला
असा विद्वान होणार नाही 
कोणी झालाच हो कोणी झालाच 
कोणी झालाच विद्वान मोठा 
बुद्ध भगवान होणार नाही 
छाती ठोक हे सांगू जगाला

दिन दुबळ्यांची उडवूनी सुस्ती 
चतुर्वरनाची जिरवूणी मस्ती
कधी हरला ना हो कधी हरला ना 
कधी हरला ना ज्ञानाची कुस्ती 
असा पहिलवान होणार नाही 
छाती ठोक हे सांगू जगाला

ज्याच्या घटनेवर चाले हे राज 
ज्ञान वैभव हे त्यालाच साज 
कुबेरालाही हो कुबेरालाही 
कुबेरालाही वाटावी लाज 
असा धनवान होणार नाही 
छाती ठोक हे सांगू जगाला

ओझं पाठीशी हे उपकाराच
कस फिटणार त्या युगांधराच 
हे रमेशा त्या हे रमेशा त्या 
हे रमेशा त्या प्रभाकराच 
कार्य गुणगान होणार नाही 

छाती ठोक हे सांगू जगाला
असा विद्वान होणार नाही 
कोणी झालाच विद्वान मोठा 
बुद्ध भगवान होणार नाही 

छाती ठोक हे सांगू जगाला

❤❤❤

टिप्पण्या