क्रांतिसूर्य महात्मा फुले ह्यांचा २८ नोव्हेंबर हा महानिर्वाण दिवस. जातीयवादाच्या चक्रात सापडलेल्या दिन दुबळ्यांचा कैवारी म्हणजे महात्मा फुले. ह्या स्वाभिमानी नेत्याने देशाच्या सामाजिक जीवनात अशी काय उलथापालथ घडवली कि त्याची दखल इतिहासाला घ्यावीच लागली.त्याग,आदर्श, साहस ह्याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे महात्मा फुले. समाजसेवेला आपले पूर्ण जीवन वाहून घेतलेले दाम्पत्य म्हणून फुले दाम्पत्याचे स्थान इतिहासात कायम अग्रणी राहील.तथाकथित उच्चवर्णीय समाजाकडून होणाऱ्या अन्यायापासून, अत्याचारापासून व गुलामगिरीतून तथाकथित शूद्रातिशूद्र नि समस्त स्त्री वर्गाची मुक्तता व त्यांना हक्काची जाणीव करून देणे हे ह्या महात्म्याचे जीवितकार्य होते. केशवपन सारख्या विकृत नि अमानवी रुढीविरुद्ध हा महात्मा उभा ठाकला नि त्यांनी विधवांच्या केशवपनाविरुद्ध न्हाव्यांचा संप घडवून आणला.स्त्री नि अस्पृश्य ह्यांच्या शिक्षणाविरुद्ध शब्दही काढणे हे पाप मानले जात असतानाच्या...
नमस्कार मित्र /मैत्रिणींनो , मी हा माझा ब्लॉग अशा साठी तयार केलेला आहे की , या मध्ये तुम्हाला नवनवीन कविता , लेख , चारोळी, व समाजप्रबोधन करणारे विचार वाचायला मिळतील .