B
|| आई ||
आई म्हणजे असते
एक माये चा पाझर
आई ची माया असते
एक आनंदाचा सागर
आई म्हणजे असतो
एक घराचा आधार
आई विना ते गजबजलेले
घरच असते निराधार
आई च्या एक हाकेत
ते घर सारं मावतं
मन-आधारा च्या पोटी
सारयांना आई च घर दावतं
आई च्या हाताला
असते चव लई भारी
आई चा हाताने
खाण्याची बातच हो न्यारी
आई च्या कूशीतला तो
विसावा खूप अनमोल
विचलित मनाला तो
नेहमीच देई समतोल
आई चा राग म्हणजे
बेभान ढगांचा गडगडाट
अवघड असते खुप
तेव्हा सापडणे आपली वाट
सोसताना वेदना
मुखातून एक शब्द नेहमी येई
प्रेमाचा पाझर पसरून त्या वेदनेवर
वेदना नाहिशी करते आई ...

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा