मुख्य सामग्रीवर वगळा

लेख क्र.3 शेतकरी राजा


                 "शेतकरी" एक अशी व्यक्ती जी आपल्या कष्टाने,मेहनतीने आपल्या शेतात राबते. वेगवेगळ्या हंगामा मध्ये वेगवेगळी पिके घेऊन त्यातून उत्पादन मिळवते आणि बाजारपेठेत नेऊन व्यापाऱ्याला किंवा ग्राहकाला विकते, अशी व्यक्ती म्हणजे शेतकरी.                                                                            शेती ही फार पुरातन काळापासून चालत आलेली आहे. आपले पूर्वज [आदिमानव] यांच्या विचारातून व युक्ती तुन या संकपलनेचा उगम झाला व तो तसाच पुढे चालत राहिला. महाराष्ट्रामध्ये शिवाजी महाराजांच्या कालखंडात शेतकऱ्याला खूप महत्वाचे स्थान होते. दिवाळीच्या सणाला प्रत्येक घरात शेतकऱ्यांसाठी [बळीराजा] प्रार्थना केली जायची, 'इडा पीडा टळो आणि बळीचं राज्य येवो' असा आवाज घराघरातून ऐकू यायचा.

                 शेतकऱ्यांला शेती करण्यासाठी लागणाऱ्या गोष्टींमध्ये प्रथम "सुपीक" शेती(जमीन) जिला तो "काळी आई" असं सुद्धा संबोधतो. दुसरं म्हणजे "पाणी"..! कारण शेतीला मुबलक पाणी असेल तरचं शेती करणे शक्य आहे. तिसरं म्हणजे "मनुष्यबळ" ज्यामुळे तो शेतातील पिकांची निगा करू शकतो. चौथे म्हणजे "पैसा" (भांडवल) शेती करतांना येणारा खर्च पूर्ण करण्यासाठी आणि शेवटी "बाजार पेठ" ज्यात तो आपला पिकवलेला शेतमाल विकतो. शेतकऱ्यांसाठी त्याची शेतीच सर्व काही असते. त्याच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह आणि जगात वावरणारे लोकं कळत न कळत या शेतकऱ्यावर अवलंबून असतात. पण त्याची कोणालाच जाण नसते.

               शेतकरी हा शब्द जेवढा बोलायला सोप्पा वाटतो तेवढा सोप्पा नाही. शेती करतांना अनेक अचानक येणाऱ्या संकटांचा सामना शेतकऱ्याला करावा लागतो, ज्यात बेमोसमी पाऊस, ओला दुष्काळ, कोरडा दुष्काळ, बाजारपेठेतील बाजारभावात होणारी घसरण, शेतीसाठी सावकाराकडून किंवा बँक इ. कडून घेतलेले कर्ज परतफेडीची मुदत, निर्यातीतील होणारे शासकीय बदल या सर्व संकटांला शेतकरी प्रत्येक वेळेस सामोरे जातो असतो. हवामानात अचानक होणाऱ्या बदलांमुळे शेतातील पिकांचे नुकसान होते. हजारो लाखो पैसे खर्च करून शेतकरी आपला शेतमाल तयार करतो त्याची काळजी घेतो. पण त्याच्या कष्टाला कधी फळं मिळतेच असे नाही.                                                धन्यवाद.....

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पहिली माझी ओवी ग, सावित्रीच्या बुद्धीला.

    पहिली माझी ओवी ग, सावित्रीच्या बुध्दीला स्त्रियांच्या शिक्षणाचा, पाया तू घातला अशिक्षित अडाणी तू, पतीपाशी शिकली मुलींसाठी पहिली, शाळा तू काढली दुसरी ओवी गाईली, तुझ्या ग धैर्याला दगडगोटे खाऊनी, चालवली तू शाळा घराबाहेर काढिले, गुंडांनी अडविले धीराने तोंड दिले, सगळ्या त्रासाला तिसरी माझी ओवी ग, तुझ्या मोठया मनाला फसलेल्या विधवेचा, सांभाळ तू केला अबला नि अनाथांचे, मायबाप होऊन यशवंत बाळाला, दत्तक घेतला चौथी ओवी गाईली, तुझ्या थोर हृदयाला माणुसकीचा झरा ज्यातं, नित्य ग वाहिला जोतिबांची सावली, नाही तू राहिली सत्यधर्म प्रकाशात, तेजानं तळपली दु:खितांच्या सेवेत, देह तू ठेविला स्मरण तुझे करुनी, वसा मी घेतला भगिनींना जागवीन, संघटीत करीन ज्ञानज्योत लावीन, हेच तुला नमन..                                      धन्यवाद...

मुलगी वाचवा देश वाचवा !

              आपल्या देशात मुलींची संख्या मुलांच्या तुलनेत दिवसेंदिवसघटताना दिसत आहे. हे असे लिहण्याला अनेक सामाजिक सांस्कृतिकआणि वैचारिक गोष्टी कारणीभूत आहेत. आज आपल्या देशाच्या जडणघडणीत स्त्रियांचामोलाचा वाटा आहे. पण भविष्यात तो पुरूषांच्या बरोबरीचा असणार आहे. भविष्यात आपला देश जर उत्तमरित्या घडवायचा असेल तर मुली वाचायला हव्यात. मुलींची मुलांच्यातुलनेतील संख्या कशी वाढेल याकडे गांर्भियाने लक्ष दयायला हवे. आपल्या देशातस्त्री-पुरूष समानतेचा फक्त गाजावाजा होतोय पण ती समानता प्रत्यक्षात आलेली कोठेही पाहायला मिळत नाही. त्यामुळेच देशातील स्त्रियांची संख्या पुरूषांच्या तुलनेतकमी होत चाललेली आहे. बालमृत्यू होण्याच्या घटनेतही मुलींच बालमृत्यू होण्याचप्रमाण अधिक आहे.   समाजात मुलींच्या संगोपनात हलगर्जीपणा केला जातो हे सत्यनाकारता येणार नाही इतकच नव्हे तर समाजातील काही घटकात मुलीला जन्म देणार्या आईचीही उपासमार होताना दिसते. आज ही आपल्या देशातील बर्याचश्या भागातील स्त्रियासुशिक्षीत सुसंस्कृत असतानाही पुरूषांच्या हातातील खेळणे झाले असल्याचे दिसतात त्यंच...

राष्ट्रमाता सावित्रीबाई फुले

                         राष्ट्रमाता  सावित्रीबाई फुले  क्रांतिज्योती राष्ट्रमाता सावित्रीबाई फुलेंचा जन्म ३ जानेवारी १८३१ ला नायगाव येथे खंडोजी नेवसे पाटील यांच्या त्या कन्यारत्न . १८४० साल महात्मा जोतीबा १३ वर्षाचे व सावित्रीआई ९वर्षाच्याअसतांना ह्या दोन तेजस्वी ज्योतींचा संयोग म्हणजेच त्यांचा विवाहझाला पुढच्या आयुष्यात दोघांच्या हातुन पुरोगामी,क्रांतीकारक,शुद्रातिशुद्रांच्या स्थितीत बद्दल, स्त्रीयांचे शैक्षणिक व सामाजिक जागृतीचे महान क्रांतिकारक कार्य १८४८ला मुलींन साठी आणी नंतर शुद्रांसाठी पहीली शाळा काढुन जोतीबांनी ज्ञानाचा दिप उजळला त्यातली ज्योत होते जोतीबा व तेल झाल्या सावित्रीआई आणी त्यांनी हा सारा भारत देशाला प्रकाशमान करुन उजळविले. महारवाडयात स्थापन केलेल्या शाळेत सगुणाबाई व सावित्रीआई कडुन शिक्षिकसेवेचे महान योगदान लाभले.सोबतच ज्योतीबांनी भिडे वाडयातल्या मुलींन च्या शाळेत त्यांना विनावेतन शिक्षिकेचे असे"पातक" कार्य करित होत्या.त्या शाळेत जातांना भट-ब्राम्हणा कडुन त्यांना छळले जाई त्यांना खडे,गोटे दगड ...