छ. शाहू महाराज (कोल्हापूर) : (२६ जून १८७४ – ६ मे १९२२). करवीर तथा कोल्हापूर संस्थानचे थोर समाजसुधारक. प्राथमिक शिक्षण , जातिभेद-निवारण , अस्पृश्यता-निवारण इ. सुधारणांचे पुरस्कर्ते. त्यांचा जन्म कागलच्या जहागीरदार घाटगे घराण्यात जयसिंगराव आणि राधाबाई ह्या दांपत्याच्या पोटी झाला. त्यांचे पूर्वाचे नाव यशवंतराव. बहुजन समाज शिकून शहाणा झाल्याशिवाय त्यांचे दारिद्र , अज्ञान व अंधश्रद्धा नष्ट होणार नाहीत , हे जाणून शाहूंनी शिक्षणाच्या , विशेषतः प्राथमिक शिक्षणाच्या प्रसारावर भर दिला. त्यानुसार त्यांनी आपल्या संस्थानात सक्तीच्या मोफत प्राथमिक शिक्षणाचा कायदा केला आणि तो अमलात आणला (१९१७). प्रत्येक खेड्यात प्राथमिक शाळा सुरू केली. प्राथमिक शिक्षणावर या संस्थानात होणारा खर्च मोठा होता. ...
नमस्कार मित्र /मैत्रिणींनो , मी हा माझा ब्लॉग अशा साठी तयार केलेला आहे की , या मध्ये तुम्हाला नवनवीन कविता , लेख , चारोळी, व समाजप्रबोधन करणारे विचार वाचायला मिळतील .