मुख्य सामग्रीवर वगळा

पर्यावरण दिन विशेष


    या भारत भुमीत देशाचे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी. मोठ्या.  प्रमाणात क्रांती झाली.दुधगंगा घरोघरी पोहचण्यासाठी मोठी क्रांती झाली आणि आज आपल्या पुढे स्वप्न आहे हरीतक्रांतीचे ! का माझा देश हरितक्रांतीने नटला नव्हता ? भारताला प्राचीन काळापासून जे वैभव प्रात्प होते ते कोठे गेले.
            “सुजलाम सफलाम सस्यशामला मातरम”
                 अशी होती माझी धरणी. पण आज वेगळे वैविध्याने नटलेली पाचूच्या बेटासारखी.चित्रे माझ्या पुढे आहे.हिरवेगार असणारे डोंगर.आज ही धरती उजाड दिसत आहे.दूर दूर झाडे दीसत नाही.फार उन लागते.पर्यावरणाचा मोठ्या प्रमाणात –हास झाला. हे कशामुळे झाले.जंगल भागातील मोठे मोठे भाग आपण आधीच कापून साफ केले.त्यातील लाकूड इमारत बांधण्यासाठी,लाकडी वस्तू तयार करण्यासाठी.इंधनासाठी , कागद निर्मिती करण्यासाठी, सुद्धा वापरले खरे.म्हणजे जंगल हे एका प्रकारचे कोठारच आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. प्राणी,पशू ,सुक्ष्म जीव येथे आढळतात.आज हे सारे संपत चालले आहे.
             वृक्षाची काळजी घेण्याबाबत शिवाजी महाराज कीती दक्ष होते. पण  आपण मात्र कळतयं पण वळत नाही.अशी आपली स्थिती झाली आहे. पण निसर्गाच्या बाबतीत आपण सगळेच स्वार्थी झालो आहोत.पृथ्वीवर वाढत जाणारी लोकसंख्या, प्रदूषण आणि ओद्योगिकरण या सर्वांचा धोका निसर्गाला होत आहे.
                     हा नाश थांबवा ! हा नाश थांबवा !

 ही वसुंधरा जनसंख्येच्या ओझ्याने रडत आहे.ह्या लोकसंख्ये मुळे वृक्षतोड मोठ्या प्रमाणात होउन आज त्या ठीकाणी सिमेंटची कृत्रिम जंगले तयार झालेली दिसून येतात.जमिनीच्या वाढत्या मागणी मुळे मोठ्या प्रमाणात जंगलांचे आतिक्रमण होत आहे.जंगले नाहीशी झाली.साधन सामग्रीचा वापर यामुळे जंगलांची घट निर्माण झाली आहे.ओद्योगिक आणि वाहतूक यामुळे प्रदुषण वाढले.सुगंधी फवा-यातून आणि शीतपेयांमध्ये वापरण्यात येणा-या या सी एफ सी वायूमुळे पृथ्वीवरील सभोवताली असणा-या ओझोनच्या थराला धोका निर्माण झाला आहे .त्यातूनच जागतिक तापमानाची वाढीची समस्या निर्माण झाली व अश्या समस्या तंत्रविज्ञानाच्या विकासातून उद्भवल्या आहे हे नाकारता येत नाही.तसेच अनेक समस्यांना सामोरे जावे लागणार आहे याचे गांभिर्य जाणले पाहीजे.प्रदुषणावर नियंत्रण ठेऊन पर्यांवरणाचे संरक्षण करणे ही काळाची गरज आहे हे आपण आळखले पाहीजे.
           
                  आपण आपल्या सुखासाठी आपला नाश ओढवून घेत आहोत.वृक्षामुळे मिळणारी शितलता,वायू ,फळ,फुले सर्व काही आज हे स्वप्न वाटु लागले आहे.माझ्या स्वप्नाची पुर्णता करायची असेल तर झाडे लावणे आवश्यक आहे.अतिरिक्त लोकसंख्या आटोक्यात आणण्यासाठी शासनाचे जसे प्रमाण आहे तसेच समाजाचे सुद्धा असले पाहीजे.पर्यावरणाचा समतोल राखण्याचा प्रयत्न केला पाहीजे.वनतोड कमी प्रमाणात केली पाहीजे.एका समस्येतून दुसरी समस्या निर्माण होताना माणसाने हे लक्षात घेतले नाही की,हा आपला नाश आहे आणि आपणच आपला नाश ओढावून घेत आहे.
                      वृक्ष वल्ली आम्हा सोयरे वनचरे..
असे तुकाराम महाराज म्हणतात.वृक्षाबद्दल एवढ आपण मित्रासारख सांगावं.शांतिनिकेतन सारखी शाळा वृक्षराशीच्या समवेत असावी म्हणुन रविंद्र नाथ टागोरांनी शांतिनिकेतनची स्थापना केली.माणसाच्या मनाला शांताता मिळतो तो दाट शांत गार सावलीत.ह्या भारतमातेचे सजल रुप पाहायचे असेल नंदनवन फुलवायचे असेल तर प्रत्येकाने आपला वाटा उचलला पाहीजे.झाडे लावणे,वृक्षांचे संवर्धन करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे.कारण ती ही आपल्या सारखी सजीव !
म्हणून आपण सर्वांनी पर्यावरणाची काळजी घेतली पाहिजे.

                                                             धन्यवाद......

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पहिली माझी ओवी ग, सावित्रीच्या बुद्धीला.

    पहिली माझी ओवी ग, सावित्रीच्या बुध्दीला स्त्रियांच्या शिक्षणाचा, पाया तू घातला अशिक्षित अडाणी तू, पतीपाशी शिकली मुलींसाठी पहिली, शाळा तू काढली दुसरी ओवी गाईली, तुझ्या ग धैर्याला दगडगोटे खाऊनी, चालवली तू शाळा घराबाहेर काढिले, गुंडांनी अडविले धीराने तोंड दिले, सगळ्या त्रासाला तिसरी माझी ओवी ग, तुझ्या मोठया मनाला फसलेल्या विधवेचा, सांभाळ तू केला अबला नि अनाथांचे, मायबाप होऊन यशवंत बाळाला, दत्तक घेतला चौथी ओवी गाईली, तुझ्या थोर हृदयाला माणुसकीचा झरा ज्यातं, नित्य ग वाहिला जोतिबांची सावली, नाही तू राहिली सत्यधर्म प्रकाशात, तेजानं तळपली दु:खितांच्या सेवेत, देह तू ठेविला स्मरण तुझे करुनी, वसा मी घेतला भगिनींना जागवीन, संघटीत करीन ज्ञानज्योत लावीन, हेच तुला नमन..                                      धन्यवाद...

मुलगी वाचवा देश वाचवा !

              आपल्या देशात मुलींची संख्या मुलांच्या तुलनेत दिवसेंदिवसघटताना दिसत आहे. हे असे लिहण्याला अनेक सामाजिक सांस्कृतिकआणि वैचारिक गोष्टी कारणीभूत आहेत. आज आपल्या देशाच्या जडणघडणीत स्त्रियांचामोलाचा वाटा आहे. पण भविष्यात तो पुरूषांच्या बरोबरीचा असणार आहे. भविष्यात आपला देश जर उत्तमरित्या घडवायचा असेल तर मुली वाचायला हव्यात. मुलींची मुलांच्यातुलनेतील संख्या कशी वाढेल याकडे गांर्भियाने लक्ष दयायला हवे. आपल्या देशातस्त्री-पुरूष समानतेचा फक्त गाजावाजा होतोय पण ती समानता प्रत्यक्षात आलेली कोठेही पाहायला मिळत नाही. त्यामुळेच देशातील स्त्रियांची संख्या पुरूषांच्या तुलनेतकमी होत चाललेली आहे. बालमृत्यू होण्याच्या घटनेतही मुलींच बालमृत्यू होण्याचप्रमाण अधिक आहे.   समाजात मुलींच्या संगोपनात हलगर्जीपणा केला जातो हे सत्यनाकारता येणार नाही इतकच नव्हे तर समाजातील काही घटकात मुलीला जन्म देणार्या आईचीही उपासमार होताना दिसते. आज ही आपल्या देशातील बर्याचश्या भागातील स्त्रियासुशिक्षीत सुसंस्कृत असतानाही पुरूषांच्या हातातील खेळणे झाले असल्याचे दिसतात त्यंच...

राष्ट्रमाता सावित्रीबाई फुले

                         राष्ट्रमाता  सावित्रीबाई फुले  क्रांतिज्योती राष्ट्रमाता सावित्रीबाई फुलेंचा जन्म ३ जानेवारी १८३१ ला नायगाव येथे खंडोजी नेवसे पाटील यांच्या त्या कन्यारत्न . १८४० साल महात्मा जोतीबा १३ वर्षाचे व सावित्रीआई ९वर्षाच्याअसतांना ह्या दोन तेजस्वी ज्योतींचा संयोग म्हणजेच त्यांचा विवाहझाला पुढच्या आयुष्यात दोघांच्या हातुन पुरोगामी,क्रांतीकारक,शुद्रातिशुद्रांच्या स्थितीत बद्दल, स्त्रीयांचे शैक्षणिक व सामाजिक जागृतीचे महान क्रांतिकारक कार्य १८४८ला मुलींन साठी आणी नंतर शुद्रांसाठी पहीली शाळा काढुन जोतीबांनी ज्ञानाचा दिप उजळला त्यातली ज्योत होते जोतीबा व तेल झाल्या सावित्रीआई आणी त्यांनी हा सारा भारत देशाला प्रकाशमान करुन उजळविले. महारवाडयात स्थापन केलेल्या शाळेत सगुणाबाई व सावित्रीआई कडुन शिक्षिकसेवेचे महान योगदान लाभले.सोबतच ज्योतीबांनी भिडे वाडयातल्या मुलींन च्या शाळेत त्यांना विनावेतन शिक्षिकेचे असे"पातक" कार्य करित होत्या.त्या शाळेत जातांना भट-ब्राम्हणा कडुन त्यांना छळले जाई त्यांना खडे,गोटे दगड ...