योग
हा शब्द अत्यंत सहजपणे व चुकीच्या अर्थाने वापरला जातो. योग म्हणजे फक्त योगासने
नाहीत. योग म्हणजे ध्यान नाही. योग म्हणजे हास्यक्लब मधील हसणे नाही. कृत्रिम
रित्या केलेले संमोहन म्हणजेही योग नव्हे. योग म्हणजे नियमपालनही नाही. सध्या जे
पेव फुटले ते म्हणजे योगाच्या प्रकारातील एकेक अंगाचे सादरीकरण व त्यालाच योग
संबोधायचे. कुंडलिनी योगा, पॉवरयोगा असे परदेशातही
प्रकार करतात. मुळात योग हाच योग्य शब्द आहे. योगा नव्हे. योग याचा अर्थ जोडणे.
(युज धातू) आंग्लाळलेले. लोक योगाचा योगा हा चुकीचा उच्चार करतात व त्या आंग्लाळलेल्या
चुकीची माहिती मर्यादित माहिती योग म्हणून इतरांना सांगतात.
योग
हा शब्द
'युज' या संस्कृत धातू पासून बनलेला आहे,
ज्याचा अर्थ आहे आत्म्याचे परमात्म्यात विलीन होणे. योग ही भारतातील
पांच हजार वर्ष प्राचीन ज्ञानशैली आहे. पुष्कळ लोकांचा असा समज आहे की योगाभ्यास
म्हणजे शारीरिक व्यायाम आहे, ज्यात शरीर ताणले, वाकवले, पिळले जाते आणि अवघड श्वसन प्रक्रियांचा
अवलंब केला जातो. खरेतर मानवी मन आणि आत्मा यांची अनंत क्षमता जाणून घेणाऱ्या या
विज्ञानाची ही म्हणजे योगाभ्यासाची केवळ वरवरची ओळख झाली. योगाभ्यासामध्ये जीवनशैलीचा
परिपूर्ण सारांश प्राप्त होतो.
योग
दहा हजार पेक्षा जास्त वर्षापासून प्रचलित आहे. या परंपरेचा उल्लेख नारदीय सुक्त
आणि सर्वात प्राचीन अश्या ऋग्वेदामध्ये आढळतो. हा आपणास पुन्हा सिंधू-सरस्वती
सभ्यतेचे दर्शन घडवतो. या सभ्यतेमधील पशुपतीनाथांच्या एका नाण्यावर योगमुद्रा
विराजमान आहे जी त्या काळातील योगाच्या व्यापकतेचे द्योतक आहे. अतिप्राचीन उपनिषद
बृहद अरण्यक मध्ये योगामधील काही शारीरिक आसनांचा उल्लेख आढळतो. छान्दोग्य
उपनिषदामध्ये प्रत्याहार चा तर बृहद अरण्यक मधील एका स्तवनामध्ये प्राणायाम चा
सविस्तर उल्लेख आहे. प्रचलित योगाच्या स्वरूपाचा प्रथम उल्लेख कठोपनिषदमध्ये आहे
जी आयुर्वेदाच्या कथा शाखामधील अंतिम आठ वर्गांमध्ये पहिल्यांदा येते जे मुख्य आणि
अत्यंत महत्वाचे उपनिषद आहे. येथे योगाला अंतर्मनाच्या यात्रेसाठी तसेच चेतनेच्या
विकासासाठी गरजेच्या प्रक्रियेच्या रुपात जाणले जाते.
योगाचे
एक वैशिष्ट्य हे आहे कि तुम्ही युवक असा कि वयोवृध्द,
निरोगी असा कि आजारी, योगाभ्यास सर्वांसाठी
लाभदाई आहे आणि तो सर्वांना प्रगती पथाकडे घेऊन जातो. वयपरत्वे आपली आसनांची समज
अधिक परिपक्व होऊ लागते. मग आपण शारीरिक आसनांसोबत अंतर्गत सुक्ष्मतेवर अधिक कार्य
करू लागतो.
योग
आपल्यासाठी कधीही नवीन नव्हता. आपण हे सर्व अगदी बालपणापासून करत आलो आहोत,
मग ते पाठीचा कणा मजबूत करणारे मार्जारासन असो कि पचनशक्ती वाढवणारे
पवनमुक्तासन असो. आपण शिशूंना दिवसभर काही न काही योग क्रिया करताना पाहतो. हरएक
व्यक्तीला योगाचे वेगवेगळे महत्व आणि आवश्यकता आहे. योग प्रत्येकाच्या जीवनाची
आदर्श दिशा ठरवण्यासाठी सहाय्य करायला दृढ संकल्प आहे.
प्राणायाम
म्हणजे आपल्या श्वासोश्वासाचे नियंत्रण आणि विस्तारीकरण. श्वासोश्वसाच्या योग्य
तंत्रांचा सराव केल्यास रक्तामधील आणि मेंदूला होणारा ऑक्सिजनचा पुरवठा वाढतो.
त्यामुळे प्राणशक्ती आणि जीवन ऊर्जा यांच्या नियंत्रणास मदत होते. प्राणायाम आणि
योगासने हे एकमेकास पूरक आहेत. या दोन योगतत्वांचा मिलाफ झाल्याने शरीर आणि
मनाच्या उत्तम प्रतीचे शुद्धीकरण व आत्म नियमन प्राप्त होते. प्राणायाम ही ध्यानाच्या
गहऱ्या अनुभवाची तयारी असते.
योग
संसारी,
संन्यासी, तंत्रमार्गी सर्वांसाठी आहे. योग
आदर्श जीवन प्रणाली आहे. योग हा जीवन जगण्याचा संतुलित, संपन्न,
सुलभ सुयोग्य मार्ग आहे. फक्त योगोपचार म्हणजे योग नाही. अरण्यवास,
दाढी वाढवणे,भगवे कपडे घालणे, चमत्कार , सिद्धी, शाप,यामुळे योगविद्या गूढ समजली जात होती. परंतु तशी ती नाही. शास्त्रज्ञांना
प्रयोगासाठी प्रयोगशाळा लागते. व अनुभवायचं ते (ज्ञेय) व ती क्रिया साधायची हीच
त्रिपुटी ती साधते म्हणजे खरा योग व ते साधणारा खरा योगी. तो निसंग असतो. अलिप्त
असतो. तरीही तो कर्मयोगी ताबा मिळवून राजयोगी होतो. सर्व योगमार्गाचा समन्वय साधत
योगेश्वर होतो. ते कधी ना कधी, कोणत्याही जन्मात होईल.
सुरुवात आता आहोत तेथूनच करायची,उद्दिष्टप्रातीसाठी
प्रयत्नयोग आचारयचा. ध्येयाकडे वाटचाल करायची.21 जूनला सर्वात मोठ्या दिवशी किमान
निश्चय व प्रयत्न सुरु तर करूयात
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा