मुख्य सामग्रीवर वगळा

लेख क्रमांक 1. स्वतः मधील शक्तीचा पुर्ण वापर.

   यश म्हणजे काय ?
   तुम्हांला कदाचित आश्चर्य वाटेल पण पृथ्वीवर जन्मलेल्या प्रत्येक व्यक्तीमध्ये  काही ना काही विशिष्ट शक्ती असतेच .  मी येथे  ' प्रत्येक व्यक्ती ' असा  उल्लेख केला आहे , का बरं ?  कारण तुम्ही याला अपवाद आहात , असा तुमचा गैरसमज होऊ , नये म्हणुन या विधानात तुम्ही सुद्धा समाविष्ट आहात . 
                              तुमच्या मध्ये असणार्या  शक्तीचे दुसरे एक वैशिट्ये  आहे , ते म्हणजे तुमच्याजवळ जी शक्ती किंवा कौशल्य आहे , त्या प्रकारचे कौशल्य दुसर्या व्यक्तींजवळ असू शकते . परंतु त्यात संपूर्णतः साम्य असू शकत नाही. म्हणजे बाह्यतः सारख्या वाटणार्या  कौशल्यातही वेगळेपणा आढळून येतो . 
                                         आठ दहा मराठी लेखक विनोदी लेख लिहीत असतील , तेंव्हा विनोदी लेखन हे त्यांच्यातील साम्य आहे .पण प्रत्येकाची लेखन शैली , विनोदी साहित्यविषयीचा अभ्यास , वेगवेगळा असू शकतो . कोणा दोघांच्याही लिखाणात तुम्हांला संपूर्ण साम्य दिसून येणार नाही . यावरून काय दिसते ? प्रत्येकाचे स्वतः चे कौशल्य हे त्याचे स्वतः चेच असते व ते विशिष्ठ असते . 
                                             या सत्याची कल्पना  बहुतेक लोकांना असतं  नाही . स्वतः मध्ये एक सुप्त  शक्ती आहे , हेच  त्याच्या  लक्षात येत नाही , त्यामुळे  तिचा योग्य  विकास करणे , तिचा योग्य वापर करणे , याचे ज्ञान कोठून असणार ? आपण सर्वजण  आपल्याजवळ असणार्या शक्तीपैकी  अल्पशक्तीचा वापर करतो आणि त्यावर संतुष्ट राहतो  . त्यामुळे त्या शक्तीचा  विकास करावा हे लक्षातच येत नाही
                                           म्हणूनच एका पंडिताने म्हणटले आहे , ' प्रत्येक मनुष्य  ' स्वतः जवळ असणार्या नैसर्गिक शक्तीपैकी फक्त दहा टक्के शक्तीचाच उपयोग करतो . व बाकीची नव्वद टक्के शक्ती वाया घालवतो .
                                         पंडितांच्या या विधानाला अनुसरून यशाचा अर्थ आपण शोधूया . स्वतः मध्ये असणार्या शक्तीचा पूर्णपणे उपयोग करणे याचे नाव यश .
                                           तुच्याजवळ कोणतीही कलाशक्ती  असू शकते मग ती चित्रकला असेल , संगीत असेल , कदाचित तुम्ही गोष्टी लिहू शकत असाल , किंवा छाप काम करत असाल म्हणजे ती कोणतीही कला तुम्हाला अवगत असेल त्या कलेचा पूर्ण विकास केला कि तुम्ही यशस्वी झाला , असे समजले जाते.

                                                            तुम्ही अनेक यशस्वी लोकांना लांबून पाहिलं असेल तेंव्हा तुमच्या आणि त्यांच्यामध्ये तुम्हाला खूप मोठे अंतर असल्यासारखे वाटत असेल .  ते पाहून कदाचित तुम्ही हताश झाला असाल . तुम्हाला वाटले असेल हे एवढे अंतर मी केंव्हा कापू शकेन  ? या हताश विचाराने तुम्ही पुढे जायलाही घाबरला असाल किंवा आताच्या परिस्थितीचा हताशपणे विचार करत बसत असाल , तेंव्हा एक सत्य गोष्ट लक्षात ठेवा . तुमच्या आताच्या व सुरुवातीच्या  परिस्थितीचा फारसा फरक नसेल . 
                         तुम्ही आज जी संकटे व अडचणी भोगत आहात  ? तीच सुरुवातीसहि भोगली आहेत . बहुतेकांच्या जीवनात असेच घडत असते . त्याला तुम्ही अपवाद नाही . अर्थात कित्येकजण यशस्वी होतात . यशस्वी झालेले दिसतात त्याचे कारण आहे , स्वतः च्या अडचणींवर मात  करण्याची मानसिक तयारी . स्वतः कठीण परिस्थिसमोर मान न झुकवण्याचा तडफदारपणा . ते स्वतः च्या संकटाकडे एका वेगवेगळ्या दृष्टिकोनातून पाहतात तर इतर अगदीच वेगवेगळ्या दृष्टिकोनातून पाहतात .
                                                   यशस्वी माणसे व्यवहारी शहाणपणाने आपल्या अडचणीतून मार्ग काढतात . वास्तव दृष्टिकोन ठेवुन  आपली समस्या सोडवण्याचा ते प्रयत्न करतात.  आणि तेच तर त्याच्या यशाचे गमक आहे . इतर लोक अर्धा व पाव रस्त्यापर्यंत जाता जाताच थकतात . दमून जातात . या उलट यशस्वी लोक किनार्यापर्यंत पोहचण्याची हिंमत बाळगून असतात.  आणि हेच मनोबल त्यांना साथ देते .  
                                               म्हूणन चला तर मग पुन्हा एकदा प्रयत्न करा आणि न थकता कामाला लागा व यशस्वी बना . 

                                                                                                                                      धन्यवाद ......                      



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पहिली माझी ओवी ग, सावित्रीच्या बुद्धीला.

    पहिली माझी ओवी ग, सावित्रीच्या बुध्दीला स्त्रियांच्या शिक्षणाचा, पाया तू घातला अशिक्षित अडाणी तू, पतीपाशी शिकली मुलींसाठी पहिली, शाळा तू काढली दुसरी ओवी गाईली, तुझ्या ग धैर्याला दगडगोटे खाऊनी, चालवली तू शाळा घराबाहेर काढिले, गुंडांनी अडविले धीराने तोंड दिले, सगळ्या त्रासाला तिसरी माझी ओवी ग, तुझ्या मोठया मनाला फसलेल्या विधवेचा, सांभाळ तू केला अबला नि अनाथांचे, मायबाप होऊन यशवंत बाळाला, दत्तक घेतला चौथी ओवी गाईली, तुझ्या थोर हृदयाला माणुसकीचा झरा ज्यातं, नित्य ग वाहिला जोतिबांची सावली, नाही तू राहिली सत्यधर्म प्रकाशात, तेजानं तळपली दु:खितांच्या सेवेत, देह तू ठेविला स्मरण तुझे करुनी, वसा मी घेतला भगिनींना जागवीन, संघटीत करीन ज्ञानज्योत लावीन, हेच तुला नमन..                                      धन्यवाद...

मुलगी वाचवा देश वाचवा !

              आपल्या देशात मुलींची संख्या मुलांच्या तुलनेत दिवसेंदिवसघटताना दिसत आहे. हे असे लिहण्याला अनेक सामाजिक सांस्कृतिकआणि वैचारिक गोष्टी कारणीभूत आहेत. आज आपल्या देशाच्या जडणघडणीत स्त्रियांचामोलाचा वाटा आहे. पण भविष्यात तो पुरूषांच्या बरोबरीचा असणार आहे. भविष्यात आपला देश जर उत्तमरित्या घडवायचा असेल तर मुली वाचायला हव्यात. मुलींची मुलांच्यातुलनेतील संख्या कशी वाढेल याकडे गांर्भियाने लक्ष दयायला हवे. आपल्या देशातस्त्री-पुरूष समानतेचा फक्त गाजावाजा होतोय पण ती समानता प्रत्यक्षात आलेली कोठेही पाहायला मिळत नाही. त्यामुळेच देशातील स्त्रियांची संख्या पुरूषांच्या तुलनेतकमी होत चाललेली आहे. बालमृत्यू होण्याच्या घटनेतही मुलींच बालमृत्यू होण्याचप्रमाण अधिक आहे.   समाजात मुलींच्या संगोपनात हलगर्जीपणा केला जातो हे सत्यनाकारता येणार नाही इतकच नव्हे तर समाजातील काही घटकात मुलीला जन्म देणार्या आईचीही उपासमार होताना दिसते. आज ही आपल्या देशातील बर्याचश्या भागातील स्त्रियासुशिक्षीत सुसंस्कृत असतानाही पुरूषांच्या हातातील खेळणे झाले असल्याचे दिसतात त्यंच...

राष्ट्रमाता सावित्रीबाई फुले

                         राष्ट्रमाता  सावित्रीबाई फुले  क्रांतिज्योती राष्ट्रमाता सावित्रीबाई फुलेंचा जन्म ३ जानेवारी १८३१ ला नायगाव येथे खंडोजी नेवसे पाटील यांच्या त्या कन्यारत्न . १८४० साल महात्मा जोतीबा १३ वर्षाचे व सावित्रीआई ९वर्षाच्याअसतांना ह्या दोन तेजस्वी ज्योतींचा संयोग म्हणजेच त्यांचा विवाहझाला पुढच्या आयुष्यात दोघांच्या हातुन पुरोगामी,क्रांतीकारक,शुद्रातिशुद्रांच्या स्थितीत बद्दल, स्त्रीयांचे शैक्षणिक व सामाजिक जागृतीचे महान क्रांतिकारक कार्य १८४८ला मुलींन साठी आणी नंतर शुद्रांसाठी पहीली शाळा काढुन जोतीबांनी ज्ञानाचा दिप उजळला त्यातली ज्योत होते जोतीबा व तेल झाल्या सावित्रीआई आणी त्यांनी हा सारा भारत देशाला प्रकाशमान करुन उजळविले. महारवाडयात स्थापन केलेल्या शाळेत सगुणाबाई व सावित्रीआई कडुन शिक्षिकसेवेचे महान योगदान लाभले.सोबतच ज्योतीबांनी भिडे वाडयातल्या मुलींन च्या शाळेत त्यांना विनावेतन शिक्षिकेचे असे"पातक" कार्य करित होत्या.त्या शाळेत जातांना भट-ब्राम्हणा कडुन त्यांना छळले जाई त्यांना खडे,गोटे दगड ...