मुख्य सामग्रीवर वगळा

My poems

* स्वप्न माझे  *
मी माझ्या स्वप्नांना दूर जाताना पाहिलंय ,
मी ही पाहिलंय , तिनंही  पाहिलंय , आणि इतरांनीही  पाहिलंय . 
खरं  तर तिच्याशी खूप काही बोलायचे होते ,
पण सर्व काही मनातच राहिलंय  ?
ती माझ्यापासुन  दूर जाताना  , मी मात्र  पाहतच राहिलोय . 
ती मागे वळून पाहिलं  याचं  आशेवरती  राहिलोय  . 
कदाचित  याच विचाराने माझं मन तीळ - तीळ  तुटतंय . ..... 
एके काळी  ती मला  भेटायची ,
बरच काही मनातलं  सांगायची . 
आणि सांगता सांगता  गालात  गोड  लाजायची . 
पण  आज खूप वेगळी आहे  . 
ती तिच्याच तालात आहे , मी मात्र  तिच्यातच गुंतलो आहे . 
आणि पुन्हा एकदा सर्व काही ठीक होईल ,
याच आशेवरती राहिलोय . 
आणि पुन्हा  एकदा  तिचाच  विचार करू  लागलोय . 
फक्त तिचाच विचार करू लागलोय . 
धन्यवाद  ...... 

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा