* मी आणि माझी .... *
माझी राणी ......
अचानक माझ्यावरती रुसली ,
अनेक वेळा समजूत काढली
पण शेवटी रागातच राहिली .
येता - जाता मी नेहमी तिच्याकडे पाहायचो .
ती एकदा तरी पाहिल ,
म्हणून मुद्दाम तिच्या शेजारी फिरायचो .
मी समोर दिसताच , ती मात्र मान खाली घालून निघून जायची .
नजरेला नजर कधी देत नसायची .
सगळं समजत असून सुद्धा ,
कधीही माझ्याकडे न पाहायची .
कॉलेज मध्ये नेहमी शांत असायची ,
कधीच कुणाशी बोलत नसायची .
का कुणास ठाऊक ?
नेहमी आपल्याच विचारात असायची .
दिसायला खूप सुंदर होती . आणि गालात गोड हसायची .
चेहऱ्यावरचे तिचे स्मित हास्य पाहण्यासाठी ,
नजर माझी सारखी तिच्याकडे असायची .
म्हणूनचं ती मला खूप मनापासून आवडायची .
Greet sir
उत्तर द्याहटवा